शिस्तबद्ध तुकाराम मुंढेंच्या वाढदिवसाला नियम धाब्यावर

    04-Jun-2020
Total Views |

tukaram mundhe_1 &nb

नागपूर : महाराष्ट्रभर शिस्तबद्द अधिकारी म्हणून ख्याती असलेले तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंढेंनी वाढदिवस साजरा करण्याच्या जल्लोषात कोरोना पार्श्वभूमीवर सरकारचे निर्देश धाब्यावर बसवल्याचे फोटो व्हायरल झालेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे तुकाराम मुंढे आता स्वतःसह स्वतःच्या चाहत्यांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.


३ जून हा तुकाराम मुंढेंचा वाढदिवस असतो. तुकाराम मुंढे यांची बदली नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती. नियम कायद्याच्या अनुषंगाने तुकाराम मुंढे कारवाई करताना कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत. त्यामुळे मुंढेंचे नाव नेहमी चर्चेत असते. नागपूर महापालिकेत पदभार स्वीकारल्यावरही तुकाराम मुंढे चर्चेत होते. कोरोना पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कानउघडणी करीत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. मात्र काल वाढदिवस साजरा करण्याच्या जल्लोषात तुकाराम मुंढेना कोरोनासंदर्भात बनविण्यात आलेल्या नियमांचा विसर पडला असे समजते. मुंढेंच्या वाढदिवस समारंभात उपस्थित असलेल्यांकडून सोशल डिस्टंसिगचे पालन झाले नाही. मुंढेंना केक भरवणारे पोलीस कर्मचारी एका छायाचित्रात दिसत आहेत. त्याचवेळी अनेकांच्या तोंडाला मास्क नाही. त्यानंतर तुकाराम मुंढेंनी सर्वांसमवेत फोटो काढला आहे. फोटोत सोशल डिस्टंसिगचे पालन झालेले नाही.



कायम कर्तव्यदक्षतेचे दाखले देणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे स्वतःसह इतरांवर याप्रकरणी कारवाई करणार का, असा सवाल नागपुरकरांकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जातो आहे. कारण सरकारने यासंबंधीचे आदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले होते. तसेच लग्न, वाढदिवस, सामाजिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या कारवाया राज्यभरात झाल्या आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या वाढदिवस समारंभालाही हा न्याय लागू होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतच्या वतीने करण्यात आला. मात्र मुंढे उपलब्ध झाले नाहीत.
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121