गोव्यात दहावीच्या परीक्षा सुरू

    दिनांक  22-May-2020 17:02:26
|
Dr Pramod Sawant_1 &पणजी :गोव्यात सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून खबरदारी घेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी इंग्रजीचा पेपर दिला. परीक्षेवेळी सुरक्षेचे अंतर ठेवण्यात येत आहे. यावर शिक्षण मंडळातर्फे नेमलेल्या निरिक्षकांकडून सर्व परीक्षा केंद्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गोव्यात दहावीच्या परीक्षेला एकूण १९ हजार ६८० विद्यार्थी बसले. ९ हजार ७९० विद्यार्थी आणि ९ हजार ८९०  विद्यार्थीनींचा सामावेश आहे.
२९ मुख्य केंद्र व १७९ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेतली जात असून परीक्षा केंद्रांवर परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलीस तैनात करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये यासाठीही दक्षता घेण्यात येत आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्यात येत आहे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 


विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य आहेत. गोव्यात दहावीची परीक्षा घेण्याचा आमचा निर्णय आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक हिताचा होता. सरकारने योग्य ती दक्षता घेत हे पाऊल उचलले आहे. सरकारने कोरोनामुळे उद्भवलेल्या सर्व आव्हानांचा सामना करून परीक्षेचे सुरक्षित आयोजन करण्यासाठी प्रत्येक पावले काळजीपूर्वक योजना आखली, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

महाराष्ट्रात परीक्षांची स्थिती काय ?


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांनी महिनाभरापूर्वी निर्णय घेत दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीच्या नववीपर्यंत आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीकडे अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांवर असलेला ताण लक्षात घेता ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.