आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरणार

    16-May-2020
Total Views | 101

medical staff_1 &nbs


वैद्यकीय शिक्षण, संशोधन संचालनालयाचा हिरवा कंदील


मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे रुग्णालयातील गट-ड (चतुर्थश्रेणी) ची रिक्त पदे भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यात बदली कामगार, वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकऱ्या, अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा समावेश आहे. चतुर्थ श्रेणी कामगार भरतीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. मात्र राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पाठपुराव्याला यश आले. अखेर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी महासंघासमवेत झालेल्या चर्चेनंतर या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.
 
 
 
या निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय २५०० कर्मचाऱ्याची खासगी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास शासनाने तयारी दाखवली असली तरी आशाप्रकरची भरती करण्यास संघटनेने विरोध दर्शविला आहे. राज्यातील रूग्णालयांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने रुग्णसेवा देणारे मनुष्यबळ अपूरे पडत असून कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढत आहे. त्यासाठी सर्व रूग्णालयांमधील चतुर्थश्रेणीची रिक्त पदे भरण्याबाबत व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, तसेच जे. जे. रूग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे, कामा व आल्ब्लेस रूग्णालयाचे बाबाराम कदम, पदाधिकारी संजय साळुंखे व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत या विषयावर चर्चा झाली. यावेळी चतुर्थश्रेणी भरतीमध्ये कार्यरत असलेल्या बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, वारसाहक्क यादीतील व अनुकंपा तत्वारील रखडलेल्या उमेदवारांना प्राधान्य देणे याला सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या मान्य करण्यात आल्या.


बदली कामगार वगळता इतर २५०० जागा भरताना त्या कंत्राटी पद्धतीने भरती करण्यास महासंघाने विरोध केला. कंत्राटीऐवजी सरळसेवेने कायमस्वरूपी करण्यात यावी अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात रूग्णालयांमध्ये फक्त डॉक्टर्स, स्टाफ नर्स, सिस्टर यांनाच राहण्याची सोय केली असून चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना रूग्णालयात राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे वर्ग-४ कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येणे शक्य होत नाही. प्रशासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनुसार ने-आण करण्यासाठी वाहनसेवा व त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर व इतर आवश्यक सोयीसुविधा पुरविल्यास आणि राहण्याची सोय केल्यास ते तात्काळ रुजू होतील, असे निदर्शनास आणण्यात आले. या सोयी सुविधा ऊपलब्ध करून द्याव्यात अशीही विनंती यावेळी करण्यात आली. तसेच ५०-५५ वर्षे वयोगटातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कर्तव्यात सूट देण्यात यावी, अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121