मुख्यमंत्र्यांतर्फे विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल

    दिनांक  11-May-2020 14:46:07
|
Uddhav Thackeray _1 
 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांपैकी महाविकास आघाडीतर्फे पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेतर्फे दोन अर्जांपैकी उद्धव ठाकरे आणि डॉ. निलम गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे त्यांचे बंधू तेजस ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.
 
 
 
 
 
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज विधानभवन य़ेथे दाखल केला. काँग्रेसतर्फे दोन उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक बिनविरोध होण्याचा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे काँग्रेसतर्फे एकाच उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.