मुंबईत बलिदान दिनानिमित्त दिनदयालजींचे स्मरण

    दिनांक  11-Feb-2020 11:30:17

samarpan_1  H x
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत सोमवारी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने समर्पण दिवस साजरा करण्यात आला. दक्षिण मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
 
 
यासोबतच भाजपचे मुंबईतील अनेक नगरसेवक आणि विविध पदाधिकार्यांानी देखील सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थितांना देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले, ते म्हणाले, पंडित दीनदयाळ यांच्या कार्यातून प्रतेकाने प्रेरणा घेणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजाला सकारात्मक दिशेने नेण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.