आता म.रे. होणार गारेगार ; महिला पायलटला मिळणार पहिला मान

    दिनांक  30-Jan-2020 10:51:33

AC Local_1  H x
मुंबई : मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल आता हळूहळू विकसित होत आहे. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता ती एसी लोकल मध्य रेल्वेवरही धावणार आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ही पनवेल ते ठाणे धावणार आहे. ही पहिली एसी लोकल चालवण्याचा मान हा मनीषा मस्के या महिला पायलटकडे असणार आहे. मध्य रेल्वेच्या पहिल्या एसी लोकलचे गुरुवारी उदघाटन होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा सीएसएमटी स्टेशनवरून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी या एसी लोकलचे उद्घाटन करणार आहे.
 
शुक्रवारपासून ही एसी लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. एसी लोकलच्या एकूण १६ फेऱ्या असणार आहेत. एसी लोकलसह काही स्टेशनवरील वाय फाय, सुधारित तिकीट खिडक्या, पादचारी पूल यासारख्या सेवांचेही उदघाटन केले जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातून पाच दिवस ही लोकल धावणार आहे. पहिली फेरी पहाटे ५.४४ वा. पनवेल-ठाणे मार्गावर तर शेवटची फेरी रात्री ९.४५ वा ठाणे-पनवेल मार्गावर धावणार आहे.