ती काँग्रेसची समर्थक ; ती जेएनयूत दिसली यात आश्चर्य नाहीच : स्मृती इराणी

    दिनांक  10-Jan-2020 18:18:50
|


smriti irani_1  नवी दिल्ली : जेएनयू हिंसाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेएनयूत पोहोचणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यावर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी यांनी हल्लाबोल केला. "दीपिका पदुकोण राजकीय दृष्ट्या कोणाची समर्थक आहे, हे आपल्याला माहीत असून ती आंदोलन स्थळी का गेली हे लोकांना कळायला हवे," असे स्मृती ईराणी म्हणाल्या. "जे लोक भारताचे तुकडे करू इच्छितात, त्यांना दीपिकाचा पाठिंबा आहे ,"याबाबत आम्हाला जराही आश्चर्य वाटत नसल्याचेही ईराणी म्हणाल्या.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दीपिकावर आरोप केला की
, ती कॉंग्रेसची आहे. २०११ मध्ये दीपिकाने कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. जेएनयूमध्ये जाण्यामागे ही हेच कारण आहे. इराणी म्हणाल्या की हे अजिबात आश्चर्यकारक नाही ज्या लोकांना भारताचे तुकडे करायचे आहेत. त्यांच्याबरोबर ती दिसली. मुलींना काठीने मारहाण करणाऱ्यांसोबत ती उभी राहिली. एका कार्यक्रमात स्मृती इराणी यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतानाच व्हिडिओही भाजप नेते तेजंदर पाल बग्गा यांनी ट्विट केला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.