पश्चिम बंगालमध्येही फडकला भगवा

    23-May-2019
Total Views | 164




कोलकाता : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मतदानाची मोठी चर्चा झाली. तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक टप्प्यात केलेल्या हिंसाचारामुळे अवघ्या देशाचे लक्ष बंगालकडे लागले होते. इथेही भाजपने तृणमूल काँग्रेसला कडवी लढत देत १८ जागांवर विजयश्री खेचून आणली. भाजपच्या मताधिक्क्यात गेल्यावेळपेक्षा भरघोस वाढ झाल्याने इथे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कमळ उमलले व भगवा फडकला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

दिल्ली, राजस्थान, गुजरात, हिमाचल, उत्तराखंड, त्रिपुरामध्ये भाजप एके भाजप

 

दिल्लीतील ७, राजस्थानमधील २५, गुजरातमधील २६, हिमाचल प्रदेशातील ४, उत्तराखंडमधील ५ आणि त्रिपुरातील दोन अशा सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. म्हणजेच या राज्यातील सर्व जागा जिंकत भाजपने काँग्रेससह विरोधकांना व्हाईट वॉश दिल्याचे स्पष्ट होते.

 

कर्नाटकात उमलले कमळ

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीला नाकारत मतदारांनी भाजपवर विश्वास टाकल्याचे यंदाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले. राज्यातील 28 पैकी सुमारे 24 जागा जिंकत भाजपने इथेही आपला झेंडा रोवला आहे.

 

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच विजेता

जम्मू-काश्मिरातील जनतेही यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील सहा जागांपैकी तीन जागा भाजपच्या खात्यात आल्या असून नॅशनल कॉन्फरन्सला दोन तर पीडीपीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat




अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंचा युतीबद्दल

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121