के. सी. पाडवींना पुन्हा घ्यावी लागली शपथ

    दिनांक  30-Dec-2019 14:10:18
|
K C Padavi _1  
 


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा सुरू असताना अॅड. के. सी. पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली आहे. शपथपत्रात दिलेल्या मजकूराव्यतिरिक्त मनोगत व्यक्त केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज झाले.


शपथपत्रात नमूद नसलेला मजकूर शपथ घेताना उल्लेख केल्यामुळे राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. पाडवी यांनी यावेळी प्रतिप्रश्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल यांनी याबद्दल तुम्ही ज्येष्ठ नेत्यांना विचारा असे सांगत पुन्हा शपथ घ्या, असे सांगितले. अखेर नमते घेत के. सी. पाडवींनी पुन्हा शपथ घेतली.
अॅड. कांगडा चंद्या पाडवी हे अक्कलकुवा मतदार संघातून काँग्रेसमधून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आहेत.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.