मराठी बिग बॉस फेम 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताच्या लग्न कार्यात नितेश राणे यांची हजेरी!
17-Feb-2025
Total Views | 52
मुंबई : मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथे १६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तिच्या या खास सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने संगितकार कुणाल भगतसोबत लग्नबंधनात अडकली. या सोहळ्याला कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. 'सिंधुदुर्गाची सुकन्या' 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यात उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या' अशी पोस्ट नितेश राणे यांनी फोटो शेअर करत केली आहे.
अंकीता 'मराठी बिग बॉस'च्या पाचव्या सिझनमध्ये अधिक लोकप्रिय झाली. त्याअगोदर अंकीता सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिध्द होती. बिग बॉस मध्ये असताना अंकिताने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या सोशल मीडियावर कुणाल आणि तिचा फोटो शेयर केला.
अंकिताच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर रंगली असून, तिच्या चाहत्यांनी तिला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.