प्रजासत्ताक दिनी गोमांस विक्री करत कट्टरपंथीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करत आरोपीवर गुन्हा दाखल

    28-Jan-2025
Total Views | 57

Beef
 
मालेगाव : राज्यातील मालेगावमध्ये देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रध्वजाखालीच गोमांस (Beef) विक्री केल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोहसीन नावाच्या कट्टरपंथी युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मालेगावातील पवारवाडीमध्ये ही घटना घडली आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी मनीष ढिलारे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. महापालिकेने २६ जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्यासंबंधित नोटीस जारी केली होती.
 
या प्रकरणामध्ये ढिलारे म्हणतात की, ही सूचना वर्तमानपत्र, माध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आली होती. मात्र आरोपी मोहसीनने सकाळी ११ वाजताच्या सुमारास जाहीर केलेल्या नोटीशीचे उल्लंघन केले. तसेच मोहसीनने राष्ट्रध्वजाखालीच गोमांस विक्री करत राष्ट्रध्वजाचाही अवमान केला. या प्रकरणाचा फोटो मालेगाव स्थानिक प्रशासनाच्या एका सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल झाला आहे. यानंतर घडलेली घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी मोहसीनचा तपास करण्यात आला. त्यानंतर संबंधित प्रकरणाचा गोप्यस्फोट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
 
आरोपीवर भारतीय ध्वज संहिता, २००२ च्या कलम २ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांतर्गत आणि महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम १०५ आणि ११७ हे लक्षात घेणे गरजेचे असणार आहे. दरम्यान २०२४ रोजी राज्य सरकारने गोमांस विक्रीवर बंदी घातली होती. गोमांस विकताना किंवा खाताना आढळल्यास पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121