मुख्यमंत्री फडणवीसांची गरुडझेप

ठाकरे सरकारच्या तुलनेत महायुतीने आणली २० पट अधिक गुंतवणूक

    24-Jan-2025
Total Views | 49
Devendra Fadanvis


मुंबई
: दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी महाराष्ट्रासाठी तब्बल १५ लाख, ७० हजार कोटी गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार केले. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. मात्र, हीच मविआ जेव्हा सत्तेत होती, तेव्हा त्यांना केवळ ८० हजार कोटींचे परकीय गुंतवणुकीचे करार करता आले. त्यांच्या तुलनेत फडणवीसांनी २० पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात दरवर्षी ‘जागतिक आर्थिक परिषदे’चे (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) आयोजन केले जाते. या बैठकीत जगभरातील निमंत्रित राज्यांचे प्रतिनिधीच सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्र राज्याच्यावतीने दरवर्षी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री शिष्टमंडळासह या परिषदेत भाग घेतात. महाविकास आघाडी सत्तेत असताना २०२२ साली या (पान ८ वर)
परिषदेचे निमंत्रण प्राप्त झाले असता, मुख्यमंत्र्यांऐवजी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दावोसला पोहोचले. त्यात उद्योगमंत्रीही (सुभाष देसाई) असले, तरी ते फारसे प्रकाशझोतात आले नाहीत. तशीच गत तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचीही.

तत्कालीन सत्ताधार्‍यांनी दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याचा दावा केला. ई-मोबिलिटी, अक्षय ऊर्जा, बॅटरी उत्पादन, डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भरीव गुंतवणूक आणल्याचे गुणगान गायले गेले. प्रत्यक्षात त्यांना केवळ ८० हजार कोटींचेच सामंजस्य करार करता आले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसहून आणलेली १५ लाख, ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही त्या तुलनेत २० पट अधिक आहे.

मविआने दावोसमध्ये केलेले करार

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन : ३ हजार, २०० कोटी

 एशिया पल्प अ‍ॅण्ड पेपर : १० हजार, ५०० कोटी

 टाटा रियल्टी : ५ हजार कोटी

 ग्राम्सी बिझनेस हब : ५ हजार कोटी

 रिन्यू एनर्जी : ५० हजार कोटी

 विश्वराज एन्व्हायर्नमेंट प्रा. लिमिटेड : १ हजार कोटी

 जीआर ग्रुप : ७४० कोटी

 स्केलर स्पेस : ६५० कोटी

 इंडोरामा कॉर्पोरेशन : ६०० कोटी

 इंडो काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड : ५१० कोटी

 कलरशाईन कोटेड प्रायव्हेट लिमिटेड : ५१० कोटी

 गोयल प्रोटीन्स : ३८० कोटी

 पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लि. : ३१५ कोटी

किती करार झाले? (दावोसमध्ये)

देवेंद्र फडणवीस सरकार : ५४

महाविकास आघाडी सरकार : २४

दावोसमधील तुलनात्मक आकडेवारी

देवेंद्र फडणवीस सरकार १५ लाख, ७० हजार कोटी

महाविकास आघाडी सरकार ८० हजार कोटी

फरक २० पट

५० हजार कोटींचा

दावा फसवा!महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अनेक फसवे दावे करण्यात आले. दावोसमध्ये एका ऊर्जा निर्मिती कंपनीसोबत ५० हजार कोटींचा गुंतवणूक करार केल्याचा दावा करण्यात आला. वास्तवात, हा सामंजस्य करार किंवा उद्योजक याविषयी माहिती उपलब्ध नाही, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121