आघाडीची बिघाडी! 'आप'च्या विरोधात काँग्रेस नेत्याची न्यायालयात धाव

    21-Jan-2025
Total Views | 76

congress1

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर 'इंडी' आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काँग्रसेचे वरिष्ठनेते संदीप दीक्षित यांनी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी दिवाणी आणि फौजदारी मानहानीचे खटले दाखल केले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी २६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत दीक्षित यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी आम आदमी पक्षाचा पराभव करण्यासाठी भाजपकडून कोट्यावधी रूपये घेतले आहेत. दीक्षित यांनी हा आरोप फेटाळत आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.
 
संदीप दीक्षित यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावत १० कोटी रूपयांची मागणी केली. २० जानेवारी रोजी यातील दिवाणी खटल्याची सुनावणी होणार होती, परंतु या सुनावणीला फेब्रुवारी पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या दरम्यान दिलली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे. सरीम नवेद यांनी दीक्षित यांचं वकिलपत्र घेतलं असून, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे सादर न करता हा दावा केल्यामुळे त्यांच्याविरोधात दीक्षितांनी कोर्टात धाव घेतली आहे. तक्रारदार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की आतिशी यांनी आपली पत्रकार परिषद समाजमाध्यमांवर प्रसारीत केली होती. दीक्षित यांची बदनामी करण्यासठी जाणीवपूर्वक आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हे कृत्य केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121