धारावीत तणावपूर्ण परिस्थिती! कट्टरपंथींनी अडवला रस्ता

    21-Sep-2024
Total Views | 35

Dharavi
 
मुंबई : धारावी (Dharavi)  येथे २१ सप्टेंबर रोजी मशीदीच्या आसपासच्या परिसरात अवैध बांधकाम तोडण्याचे काम सुरू होते. यावेळी धारावीच्या कट्टरपंथींनी यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. यामध्ये काही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात आहेत. याप्रकरणी आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. अवैध बांधकाम असलेल्या ठिकाणी आता अनेक कट्टरपंथींनी घेराव घातला आहे. कट्टरपंथी लोकं आता रस्त्यावर उतरली आहेत. धारावीत तणाव परिस्थिती असून कट्टरपंथी रस्त्यावर उतरले आहेत.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब-ए-सुबानिया मशीदीच्या भोवताली असलेले अवैध बांधकाम पाडण्यासाठी कर्मचारी आणि पोलीस प्रशासन पोहोचले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कट्टरपंथी अवैध मशीदीठिकाणी जमले होते. यावेळी त्यांनी गल्ली रोखत कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या वाहनांची तोडफोजड केली होती.
 
 
 
मेहबूब-ए-सुभानी मशिदीचा कथित बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी प्रशासकीचय विभागाची टीम धावारीवत पोहोचली होती. यावेळी घटनास्थळी स्थानिक पोहोचले होते. यावेळी मशीदीतीच्या परिसरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने घडलेला सर्व प्रकार माध्यमाला सांगितला होता. ते म्हणाले की, धारावी पोलीस ठाणे येथे शेकडो लोकं जमली आहेत. यावेळी मशीदीचे एक शिष्टमंडळ, बीएमसी अधिकारी आणि धारावी पोलीस ठाणे परिसरात आले आहे. कोणताही एक अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121