थेट अंतराळातून मतदानाचा हक्क बजावणार; दोन्ही अंतराळवीर मतदानासाठी उत्सुक!

    15-Sep-2024
Total Views | 47
vote-in-the-us-presidential-election-from-space


नवी दिल्ली : 
   भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि सहकारी विल्मोर गेल्या तीन महिन्यांपासून अंतराळात अडकलेले आहेत. नासाच्या अंतराळयानात बिघाड झाल्याने सुनीता विलियम्स अंतराळातून निवडणूक हक्क बजावणार आहे. आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता सुनीता आणि विल्मोर मतदानाचा हक्क अंतराळातून बजावताना दिसून येण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, सुनीता आणि विल्मोर यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री १२:१५ वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोघांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यात निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार का, तुम्ही मतदान करणार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना दोन्ही अंतराळवीरांनी अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकन निवडणुकीबाबत स्थानिक वातावरण अत्यंत चुरशीचे पाहायला मिळत आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस तर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात निवडणुकीच्या रिंगणात लढत होणार आहे. दरम्यान, दोन्ही अंतराळवीरांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता नासाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदान कसं करता येईल याची नासा चाचपणी करत आहे, असं विल्मोर यांनी सांगितले. तर अंतराळातून मतदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे सुनीता यांनी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121