विनेश फोगाटची प्रकृती स्थिर; अंतिम सामन्यात खेळता येणार नाही!

    07-Aug-2024
Total Views | 63
vinesh phogat disqualified


नवी दिल्ली :        विनेश फोगाटला अपात्र ठरविल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. विनेश फोगाटला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. सामन्याआधीच वाढलेले २ किलो वजन कमी करण्याच्या प्रयत्नात विनेशने जेवण वगळणे आणि धावणे यासारख्या जलद उपायांचा अवलंब केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अपात्रतेनंतर विनेशला कोणतेही पदक जिंकता येणार नाही. अतिरिक्त वजन कमी करण्याकरिता विनेशने रात्रभर मेहनत घेतली. त्याचा परिणाम म्हणून डिहायड्रेशनमुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या सर्वप्रकारानंतर विनेश फोगाटला रौप्य पदक देखील गमाववे लागणार असून तिला शेवटचे स्थान दिले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.


ऑलिंपिक कुस्ती वजन नियम

सामन्यापूर्वी दोन्ही दिवशी पैलवानांचे वजन केले जाते. स्पर्धेसाठी पात्र राहण्यासाठी कुस्तीपटूंनी दोन्ही दिवशी त्यांच्या वजन श्रेणीत राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, दहा ते वीस ग्रॅम वजन कमी करता येते परंतु, १०० ग्रॅम वजन कमी करता येणे अशक्य असते.
 



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121