"मलासुद्धा खोट्या केसेसमध्ये..."; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
12-Aug-2024
Total Views | 56
मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात मलाही अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. मविआच्या काळात खोट्या केसेस लावून विरोधकांना अडकवण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा गौप्यस्फोट माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होते. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "परमबीर सिंग यांनी केलेले आरोप सत्य आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन हे विरोधी पक्षात होते. त्यांच्याबद्दल आपण समजू शकतो. पण मी त्यांच्या मंत्रीमंडळात सहकारी मंत्री असताना माझ्याबाबतीतसुद्धा असा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे. मला खोट्या केसमध्ये अडकवून माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबतीत मी योग्यवेळी सगळं सांगेन," असे ते म्हणाले.