नोकरभरतीचा विक्रम! दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकरी

    03-Jul-2024
Total Views | 73
 
Fadanvis
 
मुंबई : दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकरी देऊन आम्ही नोकरभरतीचा विक्रम केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी सभागृहात दिली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सरकारने पारदर्शीपणे नोकरभरती करुन रेकॉर्ड तयार केला आहे. आम्ही ७५ हजार नोकरभरतीची घोषणा केली होती. ५७ हजार ४५२ लोकांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. १९ हजार ८५३ लोकांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढच्या एक महिन्यात त्यांच्या हातात नियुक्ती आदेश जाणार आहे. याचाच अर्थ आतापर्यंत ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी देण्यात आली आहे. याशिवाय ज्यावर कारवाई सुरु आहे अशी ३१ हजार २०१ पदं आहेत. त्यामुळे दोन वर्षाच्या काळात १ लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे."
 
हे वाचलंत का? -  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त अडथळा आणल्यास कठोर कारवाई होणार!
 
या अधिवेशनात पेपरफूटीचा कायदा आणू!
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, "साधारणपणे आपण जवळपास ७० लाख विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली असून यात एकही पेपरफूटीची घटना घडली नाही. या सरकारने पारदर्शी परिक्षा घेतल्या आहेत. परिक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधात आम्ही एक कायदा तयार करणार असून याच अधिवेशनता हा कायदा आणणार आहोत. याशिवाय नमो महारोजगार मेळावा आपण घेतला. खाजगी क्षेत्रात सुद्धा मोठया प्रमाणावर रोजगार मिळाले. नागपूर, पुणे, ठाणे असे अनेक ठिकाणी असे मेळावे घेण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121