मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अनिल देशमुखांचे प्रयत्न!

नितेश राणेंचा आरोप

    24-Jul-2024
Total Views | 49
 
Anil Deshmukh
 
मुंबई : तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अनिल देशमुखांनी प्रयत्न केले, असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. अनिल देशमुखांवर ईडीच्या प्रकरणातून सुटण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याचा दबाव आणण्यात आला, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. यावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.
 
नितेश राणे म्हणाले की, "अनिल देशमुख तुमच्यासमोर जो कुणी अधिकारी आला त्याने तुम्हाला खरं बोलायला सांगितलं आहे. दिशा सालियानसोबत जे खरं झालं ते सत्य तुम्ही सांगावं असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं. पण त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला लपवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न केले. तुमच्याकडे असलेली खरी माहिती तुम्हाला विचारली आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "निवडणूक आली आणि श्याम मानव यांना जाग आली!"
 
ते पुढे म्हणाले की, "दिशा सालियान तुमच्या घरची मुलगी असती तर अशीच लपवालपवी केली असती का," असा सवाल नितेश राणेंनी अनिल देशमुखांना केला आहे. तसेच अनिल देशमुख जबाबादार नेते असतील तर त्यांनी सत्य लपवू नये, असेही ते म्हणाले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121