'सरकटे का आतंक..'; खळखळून हसवून काळजात धडकी भरवणारा 'स्त्री २' चा ट्रेलर प्रदर्शित
18-Jul-2024
Total Views | 41
मुंबई : स्त्री चित्रपटाने प्रेक्षकांना वेगळीच भूरळ पाडली होती. कारण, नेमकी स्त्री कोण आहे? तिची गोष्ट काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आणि आता याचे उत्तर घेऊन स्त्री २ चा ट्रेलर आला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत.
'स्त्री २' च्या ट्रेलरमध्ये एक वेगळचं चंदेरी जग पाहायला मिळत आहे. चंदेरी गावात ज्या स्त्रीने सर्वांना घाबरवून सोडलेलं ती स्त्री आता नाही आहे. परंतु आधी लिहिल्याप्रमाणे स्त्री गेल्यावर गावात सरकटेची दहशत निर्माण होणार आहे. तसंच काहीसं झालेलं दिसतं. सरकटा गावातील स्त्रियांना पळवून घेऊन जातो. त्यामुळे गावातील महिलांना वाचवण्यासाठी पुन्हा एकदा विकी आणि त्याच्या मित्रांची गँग गावाचं रक्षण करायला सज्ज होते. त्यांच्या साथीला श्रद्धा कपूरही असणार आहे.
दरम्यान, ‘स्त्री २' ;d/e निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीत भयपटांचं एक वेगळं युनिव्हर्स तयार झालं आहे. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्सला पुढे घेऊन जाणार आहे. 'स्त्री २' १५ ऑगस्ट २०२४ ला देशभरात प्रदर्शित होणार आहे.