आषाढी एकादशीदिनी पाच हजार एसटी तैनात

चार वेगवेगळ्या बसस्थानकावर असणार व्यवस्था डॉ.माधव कुसेकर यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

    12-Jul-2024
Total Views | 67

Bus
 
मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडून लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले. डॉ.कुसेकर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एसटीने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते.
 
यावेळी डॉ. कुसेकर यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले, " यंदा पावसाची शक्यता गृहीत धरून प्रवाशांना यात्रा बसस्थानकावरील सोई-सुविधांची व्यवस्था करून द्यावी. बसेस चिखलात अडकून पडणार नाहीत अशा पद्धतीनेच पार्किंग करण्यात यावे. तसेच,आपल्या एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबरच जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक व अधिकारी यांची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी", अशा सूचना कुसेकर यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
 
ग्रुप बुकिंग असल्यास थेट गावापासून पंढरपूरपर्यंत एसटी
यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
अ.क्र. बस स्थानकाचे नाव जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस
१ चंद्रभागा बसस्थानक मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
२ भिमा यात्रा देगाव छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश
३ विठ्ठल कारखाना नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
४ पांडुरंग बसस्थानक सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121