जेएनयूची महत्त्वाची घोषणा; 'सेंटर फॉर हिंदू स्टडीज'ची स्थापना होणार!

    12-Jul-2024
Total Views | 45

JNU

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. विद्यापीठाकडून ‘सेंटर फॉर हिंदू स्टडीज’, ‘सेंटर फॉर जैन स्टडीज’ आणि ‘सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज’ स्थापन करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दि. २९ मे २०२४ रोजी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली. ‘स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज’ अंतर्गत ही केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलंत का? : विशाळगडाला अनधिकृत मशीद बांधकामापासून मुक्ती द्या; आंदोलकांची मागणी

वास्तविक जेएनयूने याकरीता एक समिती स्थापन केली होती. या समितीला विद्यापीठात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०' आणि भारतीय ज्ञान प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे मार्ग शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता ही अधिसूचना शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी जारी करण्यात आली आहे. हा निर्णय ३ दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. याआधी दिल्ली विद्यापीठाने ‘सेंटर फॉर हिंदू स्टडीज’ही स्थापन केले होते. या अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच बॅचलर पदवी देखील सुरू करण्याची योजना आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121