जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडाकडून 'जेएम स्मॉल कॅप फंड' दाखल

"एनएफओ" गुंतवणुकीसाठी १० जून २०२४ पर्यंत खुला

    03-Jun-2024
Total Views | 51

jm financials
 
 
मुंबई : जेएम फायनान्शिअल म्युच्युअल फंडाने (जेएमएफएमएफ) जेएम स्मॉलकॅप फंड नावाने नवीन गुंतवणूक योजना (NFO) खुली केली आहे, ही एक ओपन एंडेड इक्विटी योजना असून जी प्रामुख्याने स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करते.एन एफओ गुंतवणुकीसाठी खुला झाला असून, तो १० जून २०२४ रोजी बंद होईल.
 
जेएम स्मॉल कॅप फंडाची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत:
 
१. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा फायदा होणाऱ्या उच्च वाढीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

२. समभाग निवडीची प्रक्रिया-चालित पद्धती आणि पोर्टफोलिओची बांधणी तसेच जोखीम व्यवस्थापनासाठी उत्तम निर्धारीत दंडकांचे पालन

३. कॉर्पोरेट गव्हर्नन्स, व्यवस्थापन गुणवत्ता आणि त्यांची अंमलबजावणी यासारख्या नाजूक पैलूंवर केंद्रित लक्ष

४. समभाग गुंतवणूक संशोधन संघाचा, विशेषत: स्मॉल कॅप श्रेणीमध्ये समभाग निवडीच्या प्रात्यक्षिक क्षमतेसह एकत्रितपणे १३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा कामाचा अनुभव.
 
फंडाच्या अनावरण करण्याच्या प्रसंगी बोलताना, जेएम फायनान्शियल ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ मोहंती म्हणाले, 'जेव्हा आम्हाला अंतर्निहित मालमत्ता वर्गामध्ये दीर्घकालीन वाढ दिसून येते नेमके तेव्हाच आम्ही कोणतीही नवीन योजना (एनएफओ) दाखल केली जाण्यावर विश्वास ठेवतो. जेएम स्मॉलकॅप फंड हा आमच्या फंडांच्या गुलदस्त्यातील एक महत्त्वाची भर निश्चितच आहे. कारण आम्ही आमचा लार्ज, मिड आणि आता स्मॉल कॅप फंडांचा इक्विटी पोर्टफोलिओ पूर्ण करत आहोत. योजनेच्या अनावरणामुळे आम्ही पुढील काही दशकांमध्ये भारताच्या विकासगाथेचा लाभ घेण्यास सज्ज झालो आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. मला खात्री आहे की, सतीश रामनाथन आणि असित भांडारकर - जे जेएम स्मॉल कॅप फंडाचे प्राथमिक निधी व्यवस्थापक आहेत - यांच्या नेतृत्वाखालील आमचा मजबूत समभाग गुंतवणूक संघ पुढेही उच्च जोखीम संतुलित परतावा देण्यासाठी प्रयत्नशील राहिल.'
 
 
भारताच्या विकासगाथेतील स्मॉल कॅप महत्त्वपूर्ण घटक -
 
भारतीय अर्थव्यवस्था जागतिक वाढीचा दीपस्तंभ बनत असताना, प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायावर केंद्रीत स्मॉलकॅप हे भारताच्या विकासगाथेचा फायदा घेण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहेत आणि असू शकतात. हे लक्षात घेणे देखील उचित ठरेल की, ७ वर्षांच्या आणि त्याहून अधिक कालावधीचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन असल्यास, निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकाने इतक्या कालावधीत कधीत नकारात्मक परतावा दिला असल्याचे कोणतेही उदाहरण सापडत नाही.
 
या प्रसंगी टिप्पणी करताना, जेएम फायनान्शियल ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग), सतीश रामनाथन म्हणाले, 'जरी स्मॉल कॅप्स अल्पावधीत अधिक अस्थिर असले तरी गुंतवणुकीचा दृष्टिकोन दीर्घकालीन असल्यास त्यांच्यात संपत्ती निर्माण करण्याची मोठी क्षमता असते आणि खूपच कमी अस्थिरतेसह हे घडून येते.अलिकडच्या वर्षांत स्मॉल कॅप कंपन्यांनी त्यांचे ताळेबंद बळकट करण्यासाठी, आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी आणि शाश्वत वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. कर्जाचा बोजा कमी असल्याने, कंपन्यांकडे वाढीच्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता जास्त असते. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी स्मॉलकॅपचा अध्याय आकर्षक बनते.'
 
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजने संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या

लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे आंदोलन चिघळले; ४४ जण ताब्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे स्थलांतरित समुदाय आणि यूएस इमिग्रेशन व कस्टम्स एन्फोर्समेंट यांच्यातील संघर्ष हिंसक वळणावर गेल्याचे निदर्शनास येते आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले निदर्शन हाताळणे कठीण होत चालल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकले. संपूर्ण परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्तपणे नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर निदर्शनांना हिंसक वळण आल्याचे समोर येते आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121