UP मध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; आरोपी अन्वर पोलिसांच्या ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू

    27-Jun-2024
Total Views | 51
Gangrape 
 
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकूण ७ आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल हिसकावून बेदम मारहाण केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. अन्वर असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अन्य ६ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवार, दि. २५ जून २०२४ घडली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकरण लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे मंगळवारी तीन मुलांच्या आईने सामूहिक बलात्काराचा आरोप करत एकूण सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत ३० वर्षीय पीडितेने ती अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे म्हटले आहे. तिचा नवरा ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
 
असा दावा केला जात आहे की मंगळवार, दि. २५ जून २०२४ ती सुशांत गोल्फ सिटी येथील सरकारी रुग्णालयात औषधे घेण्यासाठी जात होती. खुर्दही मार्केटजवळ आधीच उपस्थित असलेल्या सात जणांनी पीडितेला पकडले. या सर्व प्रकारात पीडितेने अन्वरचे नाव मुख्य आरोपी म्हणून दिले आहे. सर्व आरोपी महिलेला जवळच्या बागेत घेऊन गेले. येथे त्यांनी महिलांवर एक एक करून सामूहिक बलात्कार केला.
  
पीडितेने आरोपीच्या कृत्याला विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी महिलेचा मोबाईलही हिसकावून घेतला. कसेबसे पीडितेने पोलीस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलीस पथकाने तातडीने या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरु केली. पण, तोपर्यंत सर्व आरोपी फरार झाले होते.
 
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३० वर्षीय अन्वरसह एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या सर्वांवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३७६ (डी) आणि ५०६ सोबत SC/ST कायद्याच्या कलम ३(२)(V) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांची पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू करण्यात आली.
  
अखेर दि. २६ जून (बुधवार) रोजी मुख्य आरोपी अन्वर याला लखनौच्या सुलतानपूर रोडवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आले. घटनेची सविस्तर चौकशी करता यावी यासाठी आरोपींचा रिमांड मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना, राज्यभरातील अनेक पक्षांकडून निरनिराळे निर्णय घेतले जात आहेत. (Local Body Election) अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Local Body ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121