Bihar Assembly Election Result 2025 : मोदीजी आणि नितीश कुमार यांनी जंगलराज उध्वस्त केले - अ‍ॅड. राजीव कुमार पांडे

    14-Nov-2025   
Total Views |
Bihar Assembly Election Result 2025 
 
मुंबई : (Bihar Assembly Election Result 2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार हे दोघेही बिहारच्या (Bihar Assembly Election Result 2025) सामान्य जनतेसाठी काम करत असून त्या दोघांनी मिळून जंगलराज उध्वस्त केले आहे,  (Bihar Assembly Election Result 2025) अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अ‍ॅड. राजीव कुमार पांडे यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
बिहार विधानसभा निवडणूकीत (Bihar Assembly Election Result 2025) भाजप-एनडीएला मिळालेल्या विजयाचे विश्लेषण करताना अ‍ॅड. राजीव कुमार पांडे म्हणाले की, “बिहारमध्ये काँग्रेसने उचलेला एसआयआरचा मुद्दा जनतेने नाकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सुशासन आणि लोककल्याणकारी कामांचा हा विजय आहे. बिहारमध्ये मोदीजी आणि नितीश कुमार यांची जोडी सुपरहिट ठरली आहे. (Bihar Assembly Election Result 2025) ते दोघेही बिहारच्या सामान्य जनतेसाठी काम करत आहेत. त्या दोघांनी मिळून जंगलराज उध्वस्त केले असून पुन्हा जंगलराज आणण्यास जनतेने नकार दिला आहे. यावेळी बिहारमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले.  (Bihar Assembly Election Result 2025) या सर्व कारणांमुळे बिहारमध्ये भाजप आणि एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे. भाजप आणि जेडीयूच्या विकासात्मक राजकारणाचा हा विजय आहे.”  (Bihar Assembly Election Result 2025)
 
हेही वाचा :  Bihar Election Results 2025 : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं अभिनंदन
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर
 
“राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपाचे हे उत्तर आहे. एसआयआरच्या समर्थनार्थ हे मत आहे. सरकारने देशात एसआयआर करण्याचा निर्णय घेतल्यावर राहुल गांधी मतचोरीचा आरोप करतात. जेव्हा जेव्हा मोदीजींवर असा हल्ला झाला तेव्हा जनतेने त्यांना उत्तर दिले. मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांमुळे सामान्य जनता त्यांच्या सोबत आहेत. बाहेरच्या लोकांना काढून टाकण्याच्या निर्णयाला जनतेने मतदान केले आहे,” असे ते म्हणाले. (Bihar Assembly Election Result 2025)
 
...म्हणून जनतेने राहुल गांधी यांना नाकारले
 
“मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांना या निकालाचे श्रेय जाते. लोकसभा निवडणूकीतही (Bihar Assembly Election Result 2025) भाजप-एनडीएने ४० पैकी ३० जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे हा पहिलाच विजय आहे असे नाही. २०१५ हे वर्ष वगळले तर गेल्या २० वर्षात भाजपने सगळ्या निवडणूकांमध्ये  (Bihar Assembly Election Result 2025) विजय मिळवला. बिहारच्या जनतेचा मोदीजी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास आहे. या निकालामुळे (Bihar Assembly Election Result 2025) संपूर्ण देशात एक सकारात्मक वातावरण असून महाराष्ट्रातील आगामी निवडणूकांमध्येही (Bihar Assembly Election Result 2025) त्याचा परिणाम होणार आहे. जनतेचे प्रश्न न मांडता राहुल गांधी मतचोरीचा आरोप करतात. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले आणि विकासाच्या मुद्दाला साथ दिली,” असे मतही अ‍ॅड. राजीव कुमार पांडे यांनी व्यक्त केले.  (Bihar Assembly Election Result 2025)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....