मुंबई : (Bihar Assembly Election Result 2025) “बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है” अशा घोषणांसह ढोल ताशे वाजवत बिहार विधानसभा निवडणूकीतील (Bihar Assembly Election Result 2025) विजयाबद्दल प्रदेश भाजपच्या वतीने मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कुमार आयलानी, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अमरजित मिश्रा, प्रदेश यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Bihar Assembly Election Result 2025)
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो. निवडणुकीच्या (Bihar Assembly Election Result 2025) अगोदरच बिहारमध्ये एनडीएला (Bihar Assembly Election Result 2025) स्पष्ट बहुमत मिळणार हे स्पष्ट होते. निवडणूक (Bihar Assembly Election Result 2025) निकालाचे चित्र पाहता काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला जनतेने सपशेल नाकारले आहे. प्रराहुल गांधी यांनी मतचोरी सारखा फेक नरेटिव्ह तयार केला. परंतू, बिहारच्या जनतेने त्यांचा डाव वेळीच ओळखला." (Bihar Assembly Election Result 2025)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात केलेल्या कामातून सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. राज्या राज्यात भेदभाव न करता त्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येकाच्या आरोग्याची चिंता केली. परंतू, याऊलट महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावर कंट्रोल होता. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात केलेला भ्रष्टाचार मुंबईकर कधीच विसरणार नाही. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक माणुसकी विसरले होते. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election Result 2025) महाराष्ट्र आणि बिहारच्या जनतेनेही त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राची दिशा ठरवणार आहे," असे म्हणत त्यांनी आगामी निवडणूकांचे रणशिंग फुंकले.(Bihar Assembly Election Result 2025)
घराघरात कमळ पोहोचवा
“केंद्रात मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकार पारदर्शकपणे काम करत आहे. सशक्त भारत बनवायचा असेल तर सशक्त भाजप महत्वाचा असून त्यासाठी सर्वांना काम करावे लागेल. प्रत्येक घरात कमळ पोहोचवणे गरजेचे आहे. ही लढाई राजकारण जिंकण्यासाठी नसून पुढच्या पिढीचे भविष्य योग्य विचारसरणीच्या हातात देणे गरजेचे आहे. बिहारने सुरुवात केली असून महाराष्ट्रात ही ५१ टक्क्यांची लढाई आपल्याला जिंकायची आहे. महाराष्ट्राची जनता भाजपला आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे,” असेही रवींद्र चव्हाण म्हणाले. (Bihar Assembly Election Result 2025)
हा तर ट्रेलर मुंबई महापालिका अजून बाकी - अमीत साटम
याप्रसंगी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपच्या वतीनेही जल्लोष साजरा करण्यात आला. आ. अमीत साटम म्हणाले की, "बिहारमधील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. संपूर्ण विजयाच्या निमित्ताने येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेवर मुंबईकरांचा आणि महायुतीचा महापौर विराजमान करण्याचा संकल्प करूया. या निकालावरून (Bihar Assembly Election Result 2025) देशात पप्पू कोण हे संपूर्ण जनतेला समजले आहे. महाराष्ट्रात पप्पू कोण हे सांगायची गरज नाही. हा निकाल तर ट्रेलर आहे मुंबई महापालिका निकाल अजून बाकी आहे," असे ते म्हणाले. (Bihar Assembly Election Result 2025)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....