Rohini Acharya : लालू प्रसाद यादव यांच्या मुलीला कुटुंबातून हाकललं, पण आरोप केलेला रमीझ खान कोण आहे?

    16-Nov-2025   
Total Views |
Rohini Acharya
 

मुंबई : (Rohini Acharya)बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी गंभीर आरोप करत कुटुंब व राजकारणापासून दूर जाण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. मात्र दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली असल्याचं समोर आलं आहे. तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ (Rameez Khan) यांनीच आपल्याला कुटुंबातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे.
 

रोहिणी आचार्य यांचा आरोप काय?
 
सोशल मिडियाद्वारे कुटुंब व राजकारणापासून दूर जाण्याची घोषणा केल्यानंतर रोहिणी आचार्य (Rohini Acharya) दिल्लीकडे रवाना होण्यापुर्वी त्यांनी पाटणा विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप करत म्हणाल्या.., “माझं आता कोणतंही कुटुंब नाही. तुम्ही तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांना विचारा. मला घरातून त्यांनीच हाकललं. जबाबदारी घ्यायची कुणाची तयारी नाही. जो चाणक्य बनतोय त्यालाच तर, विचारणार ना... पक्ष का हरला, हा प्रश्न देश विचारतोय. पण संजय, रमीझ या लोकांची नावं घेतली की घरातून काढुन दिल्या जाईल, बदनाम केल्या जाईल, शिव्या दिल्या जातील, बदनाम केलं जाईल आणि चप्पलने मारलं जाईल, असं त्या म्हणाल्या. (Rohini Acharya)


रमीझ खान कोण
 
रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी तेजस्वी यादव, संजय यादव समवेत रमीझ खान यांचंही नाव घेतलं. तेजस्वी यादव यांचे रमीझ खान हे अनेक वर्षांपासूनचे जुने मित्र आहेत. रमीझ खान (Rameez Khan)आणि तेजस्वी यादव यांची पहिल्यांदा ओळख ही क्रिकेटच्या मैदानावर झाली होती. त्यावेळी तेजस्वी यादव हे क्रिकेट खेळत असत. त्यांची तेव्हाची क्रिकेटच्या मैदानापासूनची मैत्री ही राजकारणाच्या मैदानापर्यंत येईपर्यंत अजून घट्ट झाली. राष्ट्रीय जनता दलाच्या RJD) सोशल मिडिया प्रचाराची जबाबदारी आहे. रमीझ खान हे माजी खासदार रिझवान झहीर यांचे जावाई आहे. रमीझ खान यांचं नाव आधी तुलसीपूर हिंसाचार प्रकरणात २०२१ मध्ये समोर आलं होतं. आता रोहिणी आचार्य यांनी त्यांचं नाव घेतल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.