सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळी ११.१५ वाजता १५१.६९ अंशाने घसरण होत निर्देशांक ५८५४४.९१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १२८.६० अंशाने घसरण ५१५३२.८५ पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२८ व ०.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.०५ व ०.११ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक वाढ कनज्यूमर ड्युरेबल्स (०.७४%),ऑटो (०.४७%), एफएमसीजी (०.५६%) या समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण मिडिया (१.२१%), रियल्टी (०.७२%), मेटल (०.३१%) समभागात झाली आहे.
आज मुख्यतः जागतिक स्तरावरील संमिश्र प्रतिसादाचा परिणाम भारतीय बाजारात होण्याची शक्यता आहे. विशेषतः अमेरिकन बाजारातील महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता इतक्यात दिसत नाही. तसेच डॉलरमध्ये मोठी वाढ होत आहे. याशिवाय बाजारातील लक्ष आगामी अर्थसंकल्पात व संसदेच्या अधिवेशनाकडे गेल्याने बाजारातील हालचाल वाढली आहे. अनेकदा बाजारात वाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा शनिवारी कंसोलिडेशनची फेज परतली होती त्यामुळे संध्याकाळपर्यंत शेअर बाजारात काय बदल होतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळच्या सत्रात बीएसईत सनफार्मा, एम अँड एम,पॉवर ग्रीड, नेस्ले, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, आयटीसी, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एचयुएल, टायटन कंपनी, विप्रो, मारूती सुझुकी या समभागात वाढ झाली आहे. तर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एक्सिस बँक, एचसीएलटेक, एसबीआय, कोटक महिंद्रा, रिलायन्स, टेक महिंद्रा, एशियन पेंटस, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात एनएसईत सनफार्मा,पॉवर ग्रीड, एम अँड एम, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स, आयटीसी, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एचयुएल, टायटन कंपनी, अदानी एंटरप्राईज, विप्रो, ओएनजीसी, हिंदाल्को, आयशर मोटर्स, मारूती सुझुकी या समभागात वाढ झाली आहे तर इंडसइंड बँक, अदानी पोर्टस, बजाज फायनान्स, कोल इंडिया, टाटा स्टील, इन्फोसिस, ब्रिटानिया, रिलायन्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स,भारती एअरटेल, एचसीएलटेक, टाटा मोटर्स, एशियन पेंटस, बीपीसीएल या समभागात घसरण झाली आहे.
सुरूवातीच्या सत्राविषयी प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, 'गेल्या आठवड्यात, बेंचमार्क निर्देशांकांनी उच्च पातळीवर काही विक्रीचा दबाव अनुभवला. निफ्टी २३४५५ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ७७२२१० वर बंद झाला. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली, बँक निफ्टी निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वाढला आणि ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरले.तांत्रिकदृष्ट्या, बेंचमार्क निर्देशांकांनी आठवडाभरात २३६६७. १/ ७७ ८५१.६३ या नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. तथापि, या स्तरांवर काही प्रमाणात नफा बुकिंग होते. साप्ताहिक चार्टवर एक लहान मंदीची मेणबत्ती आणि इंट्राडे चार्टवर डबल टॉप फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून संभाव्य कमकुवतपणा दर्शवते. तरीही, मध्यम-मुदतीची बाजार रचना सकारात्मक राहते. जोपर्यंत बाजार २३७००/७७८०० च्या खाली ट्रेड करत आहे तोपर्यंत आम्ही कमकुवत भावनांची अपेक्षा करतो आणि २३४००/७६७०० पातळीच्या पुन्हा चाचणीची अपेक्षा करतो. पुढील डाउनसाईड चालू राहू शकते, शक्यतो बाजाराला २३२००/७६१०० कडे ओढून नेले. दुसरीकडे, २३७००/७७८०० वरील ब्रेकआउट बाजाराला २३८००-२४०००/७८०००-७८५००च्या दिशेने नेऊ शकतो.
२३०००ते २३२०० स्तरांमध्ये क्लोजिंग आधारावर २३००० वर स्टॉप लॉससह खरेदी करण्याचे विवेकपूर्ण धोरण असेल. जर निर्देशांक २३६००/२३७०० पातळीकडे जात असतील तर पोझिशन्स कमी करत रहा.बँक निफ्टीसाठी, ५१२०० ही ट्रेंड-निर्णायक पातळी असेल. या पातळीच्या खाली, ते ५०७५०किंवा ५०५०० पर्यंत घसरू शकते, तर त्याच्या वर गेल्यास ते हळूहळू ५१७५० किंवा ५२००० च्या दिशेने ढकलले जाईल.'