लक्ष्मण हाकेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

    22-Jun-2024
Total Views | 72
 
Shinde
 
नाशिक : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शनिवारी आपले उपोषण मागे घेतले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
 
याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कालच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. कुठल्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि कुणावरही अन्याय होऊ नये याबाबत बैठकीत बरीच चर्चा झाली. अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यात काही मुद्दांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलं आहे. शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन उपोषण मागे घेतल्याबद्दल मी लक्ष्मण हाकेंचे आभार मानलो," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  कावळ्याच्या शापाने गाई मरतात का? भुजबळांचा जरांगेंना टोला
 
नाशिक शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "जवळपास ५०० संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि ५० संघटनांनी किशोर दराडे यांना पाठिंबा दिला आहे. किशोर दराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी सातत्याने विधानपरिषदेत आवाज उठवत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे ते लोकप्रिय असून एक हक्काचा आमदार म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला आहे. किशोर दराडे १०० टक्के आपल्या कामाच्या जोरावर निवडून येतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121