नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी मद्य घोटाळ्यातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या सुटीकालीन खंडपीठाने सांगितले की, ईडीच्या स्थगिती अर्जावर आदेश देण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील. न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे की, यादरम्यान याचिकाकर्ता आणि प्रतिवादी सोमवारपर्यंत लेखी उत्तरे दाखल करण्याचे स्वातंत्र्य असेल. न्यायालयाने ईडीच्या स्थगिती अर्जावर आणि केजरीवाल यांना सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिकेला नोटीसदेखील जारी केली आहे.
सुनावणीदरम्यान, ईडीचे वकील एसव्ही राजू यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय ‘एकतर्फी’ असल्याचे म्हटले. कागदपत्रांचा विचार न करता प्रकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. कागदपत्रांचा विचार न करताच निर्णय देणे हे असंबद्ध आहे. असा प्रकार हा विकृत असल्याचेहीअतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी युक्तिवाद युक्तीवादामध्ये म्हटले आहे.