टाटा पॉवरने देशभरात ८५० ई बसेस चार्जिंग बनवले मुंबईत 'या' ठिकाणी केंद्र

एक ते दीड तासात चार्जिंग शक्य

    19-Jun-2024
Total Views | 26

e bus charging
 
मुंबई: टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या ' टाटा पॉवर रिन्यूएऐबल एनर्जी (TPREL) कंपनीने महत्वाच्या महानगरात ई बस साठी लागणारे चार्जिंग पॉईंट सुरू करण्याचे ठरवले आहे. ई बसेसच्या सोयीसाठी टाटा पॉवरकडून हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कंपनीने मुंबईत देखील अनेक ठिकाणी ही सेवा सुरू केली आहे. मुंबईत बँकबे, वरळी, मालवणी, शिवाजी नगर मानखुर्द या बस स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे.
 
मुंबई प्रमाणेच इतर महत्वाच्या शहरात ही सेवा सुरु केली गेली आहे. दिल्ली, बंगलोर, श्रीनगर, जम्मू, धारवाड, लखनऊ, गोवा या शहरातही ही सुविधा सुरू झाली आहे. टाटा पॉवरने हा पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करताना तांत्रिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्यावर काम केले आहे. वाढणारे प्रदुषण पाहता या ई बस चार्जिंगमुळे १ लाख कार्बनडाय ऑक्साइड पासून मुक्तता मिळणार आहे. टाटा पॉवरने अनेक शहरात बस थांब्याची निर्मिती देखील सुरू केलेली आहे.
 
कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीकडून देशभरात २३०० हून अधिक सार्वजनिक ई बसेस सुरू केल्या आहेत.१८० ते २४० केव्ही क्षमतेच्या असलेल्या पायाभूत सुविधा टाटा पॉवर कंपनीने सुरू केल्या. पर्यावरणात बदल होताना आगामी काळातील गरज लक्षात घेता सार्वजनिक प्रवासाच्या दृष्टीने या पायाभूत सुविधांची निर्मिती कंपनीकडून करण्यात आली आहे. दिल्लीनंतर मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, जम्मू, श्रीनगर या शहरांचा सर्वाधिक चार्जिंग पॉईंट उपलब्धतेत क्रमांक लागतो.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121