मुंबई: अँपलला बाजार भांडवलात मागे टाकल्यानंतर आता एनवीडिया (Nvidia) कंपनीने मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही आता मागे टाकले आहे. बाजार भांडवल (Market Capitalisation) मध्ये एनविडिया जगातील सर्वात मोठी क्रमांक १ कंपनी बनली आहे. मंगळवारी एनविडियाचा समभाग ३.५ टक्क्यांनी वाढल्याने १३५ डॉलर्सने कंपनीच्या समभागात वाढ झाली होती. त्यामुळे क्रमांक एक वर कंपनीने पोहोचल्याने क्रमांक दोन व तीन वर अँपल व मायक्रोसॉफ्ट कंपनी पोहोचली आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बाजार भांडवल ३.३२ ट्रिलियन डॉलरवर व अँपलचे बाजार भांडवल ३.२८६ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. एनविडिया कंपनीच्या ए आय सेगमेंटमध्ये मोठी वाढ झाल्याने बाजार भांडवलात ही मोठी वाढ झाली. या महिन्यात सुरूवातील अँपल कंपनीला एनविडिया कंपनीने गेल्या दोन दशकांत पहिल्यांदा मागे टाकले आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टला अँपलने मागे टाकले होते. गेल्या नऊ महिन्यांत एनविडिया कंपनीचे बाजार भांडवल १ ट्रिलियन वरून वाढत २ ट्रिलियन वर पोहोचले होते. त्यानंतर जूनमध्ये ते ३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.
यानंतर एनविडियाचा समभाग युएसमधील S& P, NASDAQ मधील शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाली होती.LSEG डेटानुसार, ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला यांच्या प्रत्येकी सुमारे $१० अब्जच्या तुलनेत अलीकडेच दैनंदिन उलाढालीची सरासरी $५० अब्ज असून, Nvidia ही वॉल स्ट्रीटवर आतापर्यंतची सर्वात जास्त व्यापार करणारी कंपनी बनली आहे.