'या' कारणांमुळे रुपयांत डॉलरच्या तुलनेत घसरण

अमेरिकन बाजारात सीपीआय आकडेवारी येणार

    12-Jun-2024
Total Views | 33
 
rupee dollar
 
 
मुंबई: अमेरिकन बाजारातील उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने रुपयात मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने डॉलर सकाळी वधारला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८३.५९ रुपयांवर पोहोचली आहे.
 
आज अमेरिकन बाजारातील सीपीआय (Consumer Price Index) म्हणजेच ग्राहक महागाई दराचे आकडेवारी अपेक्षित आहे.तसेच बाजारात युएस फेडरल रिझर्व्ह बँकेकडून विधान येणार असल्याने अमेरिकन शेअर बाजारात वाढीबरोबरच डॉलर देखील वधारला आहे.
 
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) मंगळवारी भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते, त्यांनी मंगळवारी १११.०४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.लेबर मार्केटच्या अपेक्षित आकडेवारीपेक्षा रोजगार निर्मितीची चांगली कामगिरी झाल्यानं बाजारात व्याजदर कपात होईल का यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121