मुंबई: नवीन आलेल्या माहितीनुसार, अदानी समुहाने शेअर बाजारात झालेले नुकसान आता पूर्ण भरून काढलेले आहे. फेब्रुवारी २०२३ मधील हिंडनबर्ग शॉर्ट सेलरने केलेल्या खळबळजनक आरोपांनी अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. परिणामी गौतम अदानी यांच्या अदानी समुहाला मोठे मूल्यांकनात नुकसान झाले होते. मात्र अदानी समुहाने आपली थकित देणी चूकवून कर्ज कमी करणत नवीन प्रकल्प काही काळासाठी कमी केले होते.
त्यावेळी कंपनीला ३० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. मात्र आज शेअर बाजारात अदानी समुहाचा समभाग १.७ टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या समभागात (Shares) मध्ये चांगली वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल फेब्रुवारी २०२३ पेक्षा तीन पटीने वाढल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आज अदानी समुहाचा समभाग १.७ टक्क्यांनी वाढत ३४४५.०५ पातळीवर पोहोचला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांत अदानी समुहाने वेगाने आपला विस्तार पुन्हा सुरु केला आहे. सिमेंट व तांबे व्यवसायासाठी समुहाने जागतिक पातळीवर मोठी कर्ज काढली आहेत.
हिंडनबर्ग अहवालानंतर कंपनीच्या ५ सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन व अदानी पॉवर या कंपन्यांनी सर्वाधिक चांगले प्रदर्शन केले आहे. या कंपनीच्या भागभांडवलात ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून एनडीटीव्ही या मिडिया कंपनीत ५.५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये हा हिंडनबर्ग अहवालानंतर कंपनीला २.४ अब्ज डॉलर्स इक्विटी मूल्याचे नुकसान झाले होते याशिवाय समूह कंपनीच्या बाजार भांडवलात १५० अब्ज डॉलर्सने नुकसान झाले होते. याशिवाय गौतम अदानी यांच्या स्वतःच्या मालमत्तेत देखील घसरण झाली होती. कंपनीने कायम हिंडनबर्ग आरोप नेहमीच फेटाळले आहेत. आता कंपनीच्या बाजार भांडवलात केवळ ३० अब्ज डॉलर्सची अधिक गरज आहे ती पातळी गाठल्यास हिंडनबर्ग अहवालापूर्वीच्या आकड्यावर पुन्हा जाण्याची शक्यता आहे.
मागच्या वर्षी मार्चमध्ये जीक्यूसी पार्टनरचे राजीव जैन यांनी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याने अदानी समभागात मोठी वाढ झाली होती याशिवाय कतार इन्व्हेसमेंट अथोरिटीकडूनही समुहाने गुंतवणूक मिळवली होती.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना पिपर सेरिका अँडव्हायझर लिमिटेड फंड मॅनेजर अभय अग्रवाल म्हणाले, ' भारतात काही मूठभर समूह आहेत जे मोठे प्रकल्प करू शकतात आणि अदानी समूहाने नेतृत्वाची भूमिका घेतली आहे. गुंतवणूकदार अदानी समूहाकडे धोरणात्मक खेळ म्हणून पाहत आहेत आणि देशाच्या धोरणाची दिशा स्पष्ट असल्याने, आम्ही पुनर्प्राप्ती पाहत आहोत.'