काँग्रेसच्या स्नेहभोजनात विशाल पाटलांची उपस्थिती! चर्चांना उधाण

    23-May-2024
Total Views | 176

Vishal Patil 
 
मुंबई : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील काँग्रेसच्या स्नेहभोजनात उपस्थित झाल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात बंडखोरी करणारे विशाल पाटील निवडणूक संपताच स्नेहभोजनात सामील झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
 
सांगलीमध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह बंडखोर उमेदवार विशाल पाटीलदेखील उपस्थित होते.
 
महाविकास आघाडीने सांगलीतून उबाठा गटाच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. सांगलीत तिरंगी लढत झाल्याने महाविकास आघाडीला याचा मोठा फटका बसला. मात्र, त्यानंतर आता निवडणूक संपताच विशाल पाटील काँग्रेस नेत्यांसोबत दिसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121