मुंबई-नागपूर वन वे उन्हाळी विशेष रेल्वेसेवा

मध्य रेल्वेने दिली माहिती

    01-May-2024
Total Views | 48

railway


मुंबई, दि.१ :
उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान अतिजलद विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि. २ मे रोजी (०१/०२.५.२०२४च्या मध्यरात्री) मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने २.५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्र. ०२१०३ वन वे सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२ मे रोजी रात्री १२ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूरला पोहोचेल. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर ही ट्रेन थांबेल. दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह दोन AC 2-Tier सह AC 3-Tier, तीन AC 3-Tier, 8 स्लीपर क्लास आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी अशी या ट्रेनची रचना असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


०१ मे रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर ०२१०३ साठी बुकिंग सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121