‘क्रांतीचा निशाण आहे, बोल जयभीम!’; 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं व्हायरल

    06-Apr-2024
Total Views | 42
'महापरिनिर्वाण' चित्रपटातील जयभीम गाण्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना
 
 
 mahaparinirvan 
 
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी गेल्या वर्षी म्हणजे २०२३ रोजी सुनील शेळके दिग्दर्शित आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या भूमिकेतील 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाची (Mahaparinirvan) घोषणा करण्यात आली होती. मुळात चित्रपटाच्या नावावरुन कथानक काय असाणार याची उत्सुकता निर्माण झाली होतीच. आणि आता 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या टीमने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना संगीतमय मानवंदना देत 'जय भीम' हे गाणं प्रदर्शित केले आहे. गायक नंदेश उमप यांच्या आवाजातील क्रांतीचा निशाण आहे, बोल जयभीम! हे 'महापरिनिर्वाण' (Mahaparinirvan) चित्रपटातील गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहे.
 
mahaparinirvan 
 
समाजातील शोषित, वंचितांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करत मोठा लढा उभा केला होता. सामाजिक विषमता दुर करण्यासाठी तळागाळातील लोकांना शिक्षण हाच एक पर्याय आहे याची जाणीव देखील आंबेडकरांनी करुन दिली होती. अनेक वर्षांचा लढा ६ डिसेंबर १९५६ रोजी मावळला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचा तो मन हेलावून टाकणारा क्षण नामदेवराव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. महापरिनिर्वाण या चित्रपटाच्या माध्यमातून व्हटकरांची जीवनगाथा मांडण्यात येणार आहे.
 

mahaparinirvan 
 
'महापरिनिर्वाण' या चित्रपटात प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम असे अनेक कलाकार दिसणार आहेत. शैलेंद्र बागडे यांचे दिग्दर्शन आणि सुनिल शेळके यांची निर्मिती असलेला महापरिनिर्वाण हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121