मुंबई: आठवड्याची सुरुवात दमदार झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टीत निर्देशांकाने सकारात्मक सुरूवात केल्यानंतर बाजारात सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात सकाळी ११ वाजेपर्यंत ५१५.६६ अंशाने वाढत सेन्सेक्स ७४२२३.६९ पातळीवर व निफ्टी १०३.२० अंशाने वाढत २२५२३.१५ पातळीवर पोहोचला आहे.दोन्ही बँक निर्देशांकातही मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६५५.९५ अंशाने वाढत ५५२६२.२४ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात ४९२.१५ अंशाने वाढत ४८६९३.२० अंशाने वाढ झाली आहे. दोन्ही बँक निर्देशांकातही अनुक्रमे १.२० टक्के व १.२ टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजाराने उसळी मारली आहे.
बीएसईत (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.३० व ०.०७ टक्क्यांनी व एनएसईत ( NSE) मिडकॅपमध्ये ०.०७ वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.आज एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये बहुतांश समभागात वाढ झाली आहे.निफ्टी आयटी, रियल्टी, हेल्थकेअर वगळता इतर समभागात तुलनेने वाढ झाली आहे.सर्वाधिक वाढ निफ्टी बँक (१.८%) निर्देशांकात झाली असुन सर्वाधिक घसरण रियल्टी (१.४०) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.७९ टक्क्यांनी व Brent क्रूड निर्देशांकात ०.६० टक्क्यांनी घसरण झाली आहे.भारतीय बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) निर्देशांकात ०.७० टक्यांने घट होत प्रति बॅरेल तेलाची किंमत ६९५० रुपयांवर पोहोचली आहे. रुपयांची किंमत प्रति डॉलर वधारल्याने ८३.११ रुपये झाली आहे.
मुंबई तरुण भारतशी मागील आठवड्यात बोलताना शेअर बाजार अभ्यासक अजित भिडे यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात अंडरकरंट असल्याचे मोठे होते.त्याप्रमाणे बाजार ' बुलिश ' होताना दिसत आहे.भारतीय व अमेरिकन बाजारातील निवडणूकीचा पार्श्वभूमीवर ही मोठी वाढ मानलेली जात असताना मध्य पूर्वेकडील तणाव शांत असल्याने गुंतवणूकदारांनी आज बाजारातील स्थितीत भरोसा ठेवल्यामुळे आज बाजारात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.