रत्नागिरी : उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी माहविकास आघाडीचे रायगड आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार अंनंत गिते आणि विनायक राऊत यांच्या सभांना गैरहजर असलेले पहायला मिळत आहे. प्रचार सभांकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अनंत गिते आणि विनायक राऊत यांच्या प्रचारसभांकडे पाठ फिरवल्यावरुन भास्कर जाधव नाराज असल्याचं बोललं जात आहे. भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदासंघाचे आमदार आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघ हा रायगड लोकसभा मतदारसंघात येतो. परंतु हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला लागुल असलेला मतदारसंघ आहे.
भास्कर जाधव हे मुळचे चिपळुणचे आहेत. चिपळुण तालुका हा लोकसभेच्या दृष्टीने रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांचे उबाठा गटाच्या या नेत्यांच्या प्रचारात योगदान महत्वाचे ठरणार आहे. अशात ते सभांना गैरहजर राहत असल्याने उबाठा गटासाठी हा चिंतेचा विषय मानला जात आहे.
उबाठा गटाचे नेत अंबादास दानवे यांनी मात्र भास्कर जाधव यांची पाठराखण केली आहे. अनेक कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते सभांना गैरहजर आहेत. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि ते नाराज असण्याचे काही कारण नाही असही त्यांनी म्हटलं आहे.