मुंबई: आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मक सुरूवात झाली आहे. रामनवमीच्या विश्रांतीनंतर आज बाजाराने पुन्हा रिव्हर्स गियर टाकत बाजारात ' जान' आणली आहे. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात ३८५.२१ अंकाने वधारला असून ७३३२९.४२ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी १३५.७५ अंकाने वधारला असून २२२८३.६५ पातळीवर पोहोचला आहे.
सकाळच्या सत्रात आज ब्लू चीप कंपनीच्या समभागावरील मूल्यांकनात वाढ झाली आहे. आज बीएसईत (BSE) पॉवर ग्रीड (३.७०), भारती एअरटेल (३.६४) एम अँड एम (२.५९) टाटा स्टील (१.९१) लार्सन (१.८९) टीसीएस (१.४४) जेएसडब्लू स्टील (१.६) टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत (NSE) पॉवर ग्रीड (३.७०), भारती एअरटेल (३.५१), बीपीसीएल (२.६१) ग्रासीम (२.४३) एम अँड एम (२.४०) टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बीएसईत एस अँड पी बँक निर्देशांकात ७०.६४ अंशाने वाढ होत ५३८३३.८६ पातळीवर पोहोचला आहे तर एनएसइत बँक निफ्टी निर्देशांकात १७६.१५ टक्यांने वाढ झाली आहे. निफ्टीतील क्षेत्रीय निर्देशांकात आज हेल्थकेअर व एफएमसीजी या समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात ' हिरवा' रंग कायम दिसला आहे. सर्वाधिक वाढ मिडिया (१.६८%) ने झाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र प्रतिसाद असतानाही आज सकाळी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.