प्रियांका चोप्रा सध्या एका हॉलिवूड चित्रपटाच्या शुटमध्ये व्यस्त असून याच चित्रपटादरम्यान सेटवर झालेल्या अपघातात ती जखमी झाली आहे.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) निक जोनससोबत लग्नगाठ बांधल्यानंतर परदेशातच रमली आहे. गेला बराच काळ हिंदी चित्रपटसृष्टीपासून दुर असलेली प्रियांका सध्या हॉलिवूड गाजवताना दिसत आहे. सध्याती 'हेड ऑफ स्टेट' या हॉलिवूड चित्रपटाचे शूट करत असून सेटवर तिचा अपघात झाला आहे. या अपघातात प्रियांका किरकोळ जखमी झाली असून ही दुखापत तिच्या (Priyanka Chopra) चेहऱ्याला झाली आहे. प्रियांकानेच एक सोशल मीडियावर शेअर केला असून, तिच्या कपाळावर आणि डोळ्याच्या बाजूला आलेले ओरखडे स्पष्टपणे दिसत आहेत.
प्रियांका चोप्रा जोनासने हिने तिच्या सेटवरील अपघातानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवरुन तो फोटो शेअर केला होता. ज्यात तिच्या चेहऱ्यावरील जखम स्पष्टपणे दिसत होती. दरम्यान, सध्या ती ज्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटासाठी शुट करत आहे त्यात ती जबरदस्त ॲक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात जॉन सीना आणि इद्रिस एल्बा, स्टेफन रुट यांच्याही अनेक बडे कलाकार दिसणार आहेत.
तसेच, प्रियांका चोप्रा लकरच हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका कॅतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. तर डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'टायगर' प्रदर्शित होणार असून या माहितीपटाला प्रियांकाने आवाज दिला आहे.