ईद साजरी करण्याच्या नावाखाली शाळेत मुलांकडून करून घेतले नमाज पठण

संतप्त पालकांनी केली कारवाईची मागणी

    13-Apr-2024
Total Views | 404
 Namaz
 
डेहराडून : उत्तराखंडमधील रुरकी येथील प्ले स्कूलमध्ये आयोजित ईद कार्यक्रमात लहान मुलांना नमाज पठण करण्याचे शिकवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शाळेविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शाळाला लहान मुलांना भ्रमीत करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रुरकी येथील सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या लर्निंग लॅडर प्ले स्कूलमध्ये दि. १० एप्रिल २०२४ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ईद २०२४ साठी आयोजित करण्यात आला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन शिक्षक हिजाब घातलेले दिसत आहेत.
 
 
व्हिडिओमध्ये हे शिक्षक लहान मुलांसमोर नमाज अदा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये बसलेल्या मुलांनी त्यांच्या टी-शर्टवर लर्निंग लॅडर लिहिलेले आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगीही हिजाब घातलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सुमारे १७ सेकंदांचा आहेय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही मुलांच्या पालकांनी रुरकी पोलिस स्टेशन गाठले.
 
माध्यमांशी संवाद साधताना शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, माझी मुलगी नमाज पठण करत असताना तिथे हजर होती, या प्रकरणी आम्ही शाळेशी बोललो, शाळा याला कार्यक्रम म्हणत आहे. मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ते हिंदू आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या मुलीला नमाज का शिकवण्यात आला. गेल्या तीन वर्षांत असा एकही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. हे या वर्षी घडले.
 
 
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे मुलीच्या वडिलांनी केली. पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या इतर पालकांनी सुद्धा शाळेच्या या कार्यक्रमाला विरोध केला. तक्रारीसाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, शाळेचे काम शिक्षण देणे आहे, मुलांना धर्मांतरित करणे नाही. त्याने शाळेवर जिहादी कट रचल्याचा आरोप केला. आणखी एका व्यक्तीने आरोप केला आहे की शाळा मुलांना नमाज पठण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121