भोपाळ : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये लव्ह जिहादचे नवे प्रकरण समोर आले असून, अमन नावाच्या तरुणाने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. लग्नाबाबत बोलताना त्याने धर्मांतराची अट घातली, त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणी २१ वर्षांची असून ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण इंदूरच्या तुकोगंज पोलिस स्टेशन भागातील आहे, जिथे बुधवार, दि.१० एप्रिल २०२४ एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने तिला प्रेमाच्या नाटक करुन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अमनने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि आता तो तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत आहे.
सुरुवातीला त्याने आपली ओळखही लपवली. वृत्तानुसार, अमनने हिंदू ओळख सांगून मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते. त्याने याआधी स्वतःला हिंदू असल्याचे सांगितले होते, पण २०२२ मध्ये जेव्हा मुलीला त्याचे वास्तव कळले तेव्हा तिने स्वतःला त्याच्यापासून दूर केले.
तुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, आरोपी तरुण अमन हा शिवशक्ती नगरचा रहिवासी आहे. त्यांनी सांगितले की, मुलीने अमनचा मुलगा कलीम जाथू याच्याविरुद्ध तक्रार केली आहे. मुलगी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करते. साधारण अडीच वर्षांपूर्वी तिची अमनशी ओळख झाली.
२०२२ मध्ये जेव्हा तिला त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा मुलीने त्याच्यापासून अंतर ठेवले. यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अमन घरी आला आणि म्हणाला की त्याला लग्न करायचे आहे. त्याने धर्मांतराची अट ठेवली आणि सांगितले की तुला आपला धर्म बदलावा लागेल. तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
मुलीने बुधवार, दि. १० एप्रिल २०२४ हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली आणि पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरा पोलिसांनी अमनविरुद्ध धमकी, बलात्कार आणि मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ अमनला अटक करून तुरुंगात पाठवले.