बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक.
Read More
7 जून रोजी ईद निमित्त नमाज अदा करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान या ऐतिहासिक स्थळी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेल्या या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना सदर मागणी फेटाळण्याची विनंती केली आहे.
(Muslim Country Morocco Bans Animal Sacrifice on Bakrid) आफ्रिकेतील इस्लामिक देश असलेल्या मोरोक्कोमध्ये बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या कुर्बानी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम बहुल राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मोरोक्कोच्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. मोरोक्कोतील पशु बाजार बंद करण्यात आले असून राजाने बकरीसह कोणत्याही प्राण्
“महाराष्ट्रातील सोसायटीत जबरदस्तीने बकरा कापण्यात आला, तर हिंदुत्ववादी सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. हे कुणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही, हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. येथे शरिया कायदा चालणार नाही”, असा हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २ जून रोजी केला.
बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि
Ram Navami प.बंगाल राज्यातील कोलकाता हावडा पोलिसांनी अंजनी पुत्र सेनेला राम नवमी (Ram Navami) साजरी करू दिली नाही. तर दुसरीकडे याच पोलिसांनी ईद दिवशी मिरवणुकीला परवानगी दिली होती. राम नवमी साजरी करताना त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला होता. २०२२ आणि २०२३ मध्ये जातीय हिंसा झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षीही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले होते.
Mamata Banerjee प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल
सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिकंदर चित्रपटाने ३० मार्चपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सुरुवात केली. ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी काहींनी त्यावर टीका केली आहे. सलमान आणि रश्मिकाच्या अभिनयासह चित्रपटाच्या कथानकावरही काही प्रेक्षक नाराज असल्याचे दिसते. मात्र, तरीही पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊया.
Eid उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ईदच्या नमाज अदानंतर दोन पक्षांमध्ये दोनदा हाणामारी झाली होती. सिवाल खासमध्ये नामाद अदा केल्यानंतर मुस्लिमांच्या दोन्ही गटांमध्ये गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली. या हाणामारीत सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत.
उद्योग, ऊर्जा तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची गुढीपाडवा आणि रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
Ramadan Eid तेलंगणा सरकारने रमजानच्या सुट्टी देण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी तेलंगणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
देशात ईदच्या (Eid) दिवशी कट्टरपंथींचा कही राज्यांमध्ये उन्माद दिसून आला होता. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूर हिंदू मंदिराजवळून जात असताना काही कट्टरपंथींनी जमावाने सर तन से जुदा अशा वादंग निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या आहेत. गुस्ताख-ए-नबी की एक सजा अशा घोषणाबाजी करत मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Stone Pelting ईद मिलादुन्नीच्या मिरवणुकीत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हनुमान मंदिरावर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. यामुळे याभागात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत हनुमान मंदिरावर केलेल्या दगडफेकीत एक भाविकाला जबर मार बसला असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आता हिंदू एकटवले असून त्यांनी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचे पठण करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
आसाम पोलिसांनी कट्टर इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरीला अटक केली आहे. त्याला मंगळवार, दि. २ जुलै २०२४ प्रशासनाविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आसामचे डीजीपी जीपी सिंग यांच्या सूचनेवरून दारंग जिल्हा पोलिसांनी त्याला पकडले. मुकीबुर रहमान अझहरी यांनी सोशल मीडियावर लखमीपूर पोलीस स्टेशन आणि एसपी यांना हिंसक आंदोलनाची धमकी दिली होती.
बिहारमधील मधुबनीमध्ये वट सावित्री व्रत केल्यानंतर पूजा करणाऱ्या हिंदू महिला आणि पुरुषांवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात पूजा करण्यासाठी गेलेल्या महिला जखमी झाले आहेत. ईदगाहपासून सुमारे ५० फूट अंतरावर एक जुने वटवृक्ष आहे, जिथे प्राचीन काळापासून पूजा केली जाते, परंतु काही कट्टरपंथीयांनी गेल्या काही वर्षांपासून विरोध करत आहे. या वेळीही जेव्हा पूजा करण्यास सुरुवात केली तेव्हा कट्टरपंथीयांनी पूजेत अडथळा निर्माण करण्यासाठी हल्ला केला.
अमेरिकेतील तथाकथित वारसा करावरून काँग्रेसला अडचणीत आणणार्या Sam Pitroda controversy यांनी पुन्हा एकदा अवमानकारक असे वर्णद्वेषी विधान केले. भारतीयांना त्यांच्या वर्णावरून त्यांनी चिनी, आफ्रिकी असे संबोधले आहे. पित्रोदा यांनी आपली विभाजनाला खतपाणी देणारी काँग्रेसी मानसिकताच दाखवून दिली आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकता या शक्तिस्थळावरच त्यांनी प्रहार करण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यामुळे आता सुज्ञ भारतीय मतदारच मतपेटीतून याचे सडेतोड उत्तर काँग्रेसला दिल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.
उत्तराखंडमधील रुरकी येथील प्ले स्कूलमध्ये आयोजित ईद कार्यक्रमात लहान मुलांना नमाज पठण करण्याचे शिकवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शाळेविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शाळाला लहान मुलांना भ्रमीत करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
रमजानच्या शेवटच्या दिवशी गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ देशभरातील मुस्लिमांकडून ईद-उल-फित्र साजरी केली जात आहे. यावेळी मशिदींसह विविध ठिकाणी मुस्लिम धर्मीयांनी ईदची नमाज अदा केली. उत्तर प्रदेशातील अलीगढ आणि पंजाबमधील लुधियाना यांसारख्या काही ठिकाणी प्रार्थनेनंतर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आणि पोस्टर लावले गेले.
काल शेअर बाजारात मोठ्या दिमाखात निर्देशांकात वाढ झाली होती.आज मात्र ईद - उल - फितर निमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी ब्लू चीप कंपन्यांच्या समभागात ०.४९ टक्क्यांनी वाढ झाली होती.
रमजान ईद निमित्ताने नाशिकच्या मालेगावमध्ये ( Palestine Flag Malegaon ) गुरुवारी, दि. ११ एप्रिल रोजी कॉलेज ग्राऊंडवर सामुदायिक नमाज पठण सुरू असताना एका मुस्लिम तरुणाने पॅलेस्टीनचा ध्वज फडकवत समर्थन केलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिहारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शिक्षकांना यावेळी ईदची सुटी मिळणार नाही. बिहारच्या शिक्षकांना होळीलाही सुट्टी देण्यात आली नव्हती. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.के.पाठक यांनी जारी केलेल्या आदेशात दि. ८ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान निवासी प्रशिक्षण होणार आहे, तर ईद ११ एप्रिल रोजी येत आहे. त्यांचा सण पाहता निवासी प्रशिक्षणाची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम धर्मीय शिक्षक करत होते.
लोकसभा निवडणुक २०२४ ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लोक तृणमूल काँग्रेसच्या बॅनरसमोर आणि ममता बॅनर्जींच्या फोटोसमोर लुंगी, नमाजी टोप्या आणि साड्यांचे वाटप करताना दिसत आहेत. भाजपच्या राज्य कमिटीने दि. ५ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.
इस्लामिक राष्ट्र सौदी अरेबियाने रमजान महिन्यात मशिदींमध्ये इफ्तार आयोजित करण्यास बंदी घातली आहे. सौदी अरेबिया सरकारने म्हटले आहे की, कोणताही इमाम मशिदीच्या आत इफ्तारचे आयोजन करणार नाही. यासोबतच इफ्तारसाठी देणगी घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या दीप्ती पिन्नती यांना हे प्रकरण चांगलेच भावले आहे. सीबीआयने स्वत:ला इन्विस्टिगेटर म्हणवणाऱ्या यूट्यूबर दीप्ती आर पिन्निती विरोधात आरोपपत्र दाखल केले असून श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काहींची बनावट पत्रे तयार केल्याचा गंभीर आरोप दीप्तीवर करण्यात आला आहे.
मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह मशिदीच्या परिसराचे न्यायालयीन सर्वेक्षण करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे.
मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. एएसआय सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या मशिदीचे वकिलाकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये 18 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयात गुरुवारी (१४ डिसेंबर) या प्रकरणाची एकत्रित सुनावणी झाली.
कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादाच्या संदर्भात शाही-इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नेमण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वीकारली आहे.न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी हिंदू देवता भगवान श्रीकृष्ण विराजमान आणि इतर सात हिंदू पक्षांच्या वतीने दाखल केलेल्या अर्जावर हे निर्देश दिले आहेत. हा अर्ज उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या मूळ खटल्याचा भाग म्हणून दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये फिर्यादीने (हिंदू पक्ष) दावा केला आहे की मथुरा शाही ईदगाह मशीद कृष्ण जन्मभू
बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने नुकतेच २०२४ करिता शाळांसाठीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकात नितीश यांनी तुष्टीकरणाची एकही संधी न सोडता, दोन धर्मात तेढ कशी निर्माण होईल, याचीच पुरेपूर तजवीज केल्याचे दिसून येते. धक्कादायक म्हणजे, महाशिवरात्री, सीतानवमी, रामनवमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, हरतालिका आणि जिऊतीया या दिवशी याआधी दिली जाणारी सुट्टी पुढील वर्षापासून रद्द करण्यात आली आहे.
बिहारमध्ये इयत्ता ९वीच्या संस्कृत विषयाच्या परीक्षेत इस्लामशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप आमदार म्हणाले की, "परीक्षेचा पेपर पाहिल्यास असे वाटते की, हा एखाद्या इस्लामिक देशाचा परीक्षेचा पेपर आहे."
झारखंडमधील जमशेदपूरमध्ये कट्टरपंथी जमावाने इस्त्रायल विरोधी घोषणा दिल्या. दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर ही गर्दी ईदगाह मैदानावर जमली होती. या मेळाव्याचे नेतृत्व तंजीम अहले सुन्नत ओ जमात या संघटनेने केले. यावेळी मशिदीच्या मुफ्तींनी इतर लोकांसह धार्मिक घोषणा देत इस्रायलच्या विनाशासाठी प्रार्थना केली.
आदिगुरु शंकराचार्य गुरुकुलचे प्रवक्ते अभिषेक कुमार कुशवाह यांनी ट्विटरवर एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मोहम्मद मजीद हा उघडपणे सामूहिक हत्येची धमकी देत आहे आणि धर्माच्या नावाखाली हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
र्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या उपद्रवामध्ये वाढ झाली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२३ रोजी ईद मिलाद मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली आहे अनेक वाहने आणि घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या मिरवणुकीची व्हायरल झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये अखंड भारताचा नकाशा हिरव्या रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर मुघल शासक औरंगजेबाचे चित्र छापण्यात आले आहे. इस्लामिक शासक टिपू सुलतान आणि त्याच्या तलवारीचे कटआउट देखील प्रदर्शनात होते.
यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले. परंतु मुस्लिम समाजबांधवांनी अनंत चतुर्दशीमुळे त्यांचा सण हा गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (२९ ऑक्टो.) साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील विविध भागात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने जुलूस निघाले होते. असाच एक जुलूस विक्रोळी पश्चिम येथील पार्कसाईट भागात पार पडला. मात्र, या जुलूसमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे विक्रोळीतील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ५० हून अधिक जखमी झाले आहेत. हे लोक पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघातकी हल्ला झाला आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला.
ईदच्या मिरवणूकीत घुसलेल्या समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्यानंतर शहाद्यात तणाव निर्माण झाला. नंदूरबारमध्ये शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहाद्यात ईद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, याला काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक साईबाबा मंदिरानजीक आल्यानंतर घोषणाबाजी सुरू केली.
उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी असल्याकारणाने राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी २८ सप्टेंबरऐवजी दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे आज गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
'कुपारी’ हे वसईजवळ राहणार्या एका समाजाचं नाव. वसईवर पोर्तुगिजांचा अंमल होता. तेव्हा या भागात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले व सर्वच समाजात ख्रिस्ती आणि हिंदू असे विभाजन झाले. ब्रिटिशांच्याही पूर्वी पोर्तुगीज राजवटीत हे धर्मांतर झाले असले, तरीही आपली सांस्कृतिक मूल्ये मात्र इथल्या समाजांनी जपली आहेत. यातलाच एक समाज म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. त्यांच्यातून धर्मांतरित झालेले ते सामवेदी ख्रिस्ती, यांना ’कुपारी’ असे म्हणतात. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही शहरीकरणाचा फारसा परिणाम यांच्यावर झाला नाही आ
कर्नाटकच्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेने (HDMP) ईदगाहवर गणेशोत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे, ज्यासाठी दोन मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी आपली जागा गमावली होती. १९९४ साली या ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवण्यासाठी पोहोचलेल्या देशभक्तांवर तत्कालीन काँग्रेस सरकारने गोळीबार केला होता. त्या गोळीबारात ५ देशभक्त शहीद झाले होते. मात्र भाजपची सत्ता असलेल्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेने (एचडीएमपी) यंदाही ईदगाह मैदानावर गणेशोत्सवास परवानगी दिली आहे.
कुक्कुटपालन किंवा ईद वगैरेसाठी बोकड पालन किंवा विक्रीसाठी मत्स्यपालन, हे पशुजीवी व्यवसाय जगभरात सुरू आहेत. जगभराचे देश या व्यवसायांसाठी त्यांच्या-त्यांच्या नागरिकांना प्रोत्साहन आणि सहकार्यही करत आहे. अर्थात पशू काय, पक्षी काय? त्याचे पालनपोषण करण्यामागे माणसाचा स्वार्थ आहेच. काय पाप, काय पुण्य या पार्श्वभूमीवरची यासंदर्भातली नीतीमत्ता तपासली तर?
समाजमाध्यमात एक व्हिडीओ दि.४ जुलै रोजी व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गुरुद्वारामध्ये एक व्यक्ति आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बकऱ्यांचे शीर कापताना दिसतो. इतक्या निर्दयीपणे गुरूद्वारासारख्या पवित्र धार्मिक स्थळावर घडलेल्या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ कुठल्य़ा गुरूद्वारेतील आहे, यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप ह्या व्हिडीओबाबत कोणतीही माहिती उघड झालेली नाही.
पाकिस्तानमध्ये बकरी ईदच्या दिवशी बलुचिस्तानच्या चमन तुरुंगातून १७ कैदी फरार झाले. यादरम्यान कारागृहात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला, ज्यामध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला. हिंसाचार आणि गोळीबारात काही पोलीस रक्षक आणि कैदी जखमी झाले आहेत. पळून जाणाऱ्यांमध्ये काही दहशतवादीही आहेत.
बकरी ईदनंतर एका मंदिरासमोर म्हशीचे छिन्नविछिन्न मुंडके सापडल्याने दिल्लीतील शाहदरा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीसह दोन लोक स्कूटीवर येताना आणि कापलेले डोके फेकताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अजीम आणि १६ वर्षीय मुलाला अटक केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बकरी ईदला समाजात होणारी कुर्बानी चुकीची असल्याचे म्हटले आहे. बीएमसीला (बृहन्मुंबई महानगरपालिका) कठोर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. निश्चित ठिकाणीच कुर्बानी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने दि. २८ जून रोजी मुंबईतील नैथानी हाइट्स येथील एका रहिवाशाने दाखल केलेल्या याचिकेवर हे निर्देश दिले.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य नाहीत. परंतु तरीही परंपरेचे पालन करून, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पंजाबमधील पाकिस्तान रेंजर्सनी ईदच्या निमित्त अटारी-वाघा सीमेवर एकमेंकाना मिठाईची भेट दिली. ईदच्या निमित्त बीएसएफच्या १७६ बटालियनने फुलबारी भारत-बांगलादेश सीमेवर आपल्या १८ बॉर्डर गार्डिंग फोर्स (बीजीबी) च्या समकक्षांसोबत मिठाईची भेट दिली. दरम्यान दोन्ही देशांमध्ये ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
उस्मान बुडा याचा बाजारपेठेत कत्तलखाना होता. ईद येणार आहे. त्यानुसार बाजारपेठेत वर्दळ नेहमीपेक्षा जास्त होती. अशातच उस्मान याचे दुसर्या दुकानदाराशी चर्चा सुरू झाली. त्यातून वाद सुरू झाला. भांडण वाजलं. दुसर्या दुकानदाराने म्हटले, उस्मान याने मोहम्मद पैगंबरांविरोधात निंदात्मक विधान केले. ईशनिंदा केली. बाजारातले सगळे लोक एकत्र झाले. त्यांनी उस्मानला दगडाने ठेचून मारले. ही घटना रविवार, दि. २५ जून रोजी नायजेरियाच्या सोकोटो परिसरातली. मरणाराही मुस्लीम आणि मारणारेही मुस्लीमच! या घटनेने जगभरात संताप व्यक्त होत आहे
यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईदसुद्धा एकाच साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय नाशिकच्या चांदोरी येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. बकरी ईदनिमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईद-उल-फित्रच्या आधी शुक्रवारी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलात येथे वजू करण्यास परवानगी दिली आहे.
पाकिस्तानातील वाढती महागाई आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या भीषण स्थितीचा सामान्य पाकिस्तानींच्या क्रयशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच, विविध वस्तूंच्या किमतींनी आज तेथे सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. परिणामी, ईदसारख्या सणाच्या दिवशीही पाकिस्तानमधील बाजारपेठा गजबजलेल्या दिसत नाहीत की, उद्योजकांची कुठलीही भरभराट झाली नाही.