अवघ्या तीन दशकांत, केरळमध्ये मुख्यालय असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने जागतिक आभूषण उद्योगात यश मिळवले आहे. ब्रँडची धोरणात्मक किरकोळ विस्तार योजनेची रुपरेषा भारत आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये फैलावलेली आहे, जागतिक अग्रणी म्हणून स्थान आणखी मजबूत करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. सध्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स १३ देशांमध्ये ३४५ स्टोअर्स चालवत आहे, तर नजीकच्या भविष्यात न्यूझीलंड, इजिप्त, बांगलादेश आणि युरोपमधील अधिक ठिकाणी नवीन स्टोअर उघडण्याची योजना आहे. कंपनी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया सारख्या विद्यमान बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करत आहे. पुढील वर्षभरात १०० नवीन स्टोअर्स उघडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
समूहाने अतिरिक्त ७,००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे एकूण कर्मचारी संख्या २८,००० पर्यंत वाढेल. २६ देशांचे प्रतिनिधित्व करणारे आणि विविध भाषा बोलणारे २१,००० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, मलाबार एक गतिमान आणि सर्वसमावेशक कार्यसंस्कृतीचा प्रत्यय देते.
कंपनीच्या यशाबद्दल भाष्य करताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष, एमपी अहमद म्हणाले, "जबाबदार ज्वेलर्स म्हणून आमचे स्थान टिकवून ठेवणे ही आमच्यावरील अत्यंत मोठी जबाबदारी आहे. आमची व्यापक जागतिक उपस्थिती लक्षात घेता, आम्ही जबाबदारीने सोने योग्य स्रोतातून मिळवण्याप्रति आमची कटिबद्धता कायम ठेवतो. विशेषतः व्यक्तींच्या अधिकारांचे, लहान मुले, प्राणी आणि त्यांच्या निवासस्थान आणि उपजिविकेचे नुकसान न करणाऱ्या खाणचालकांकडून ते मिळवले जाईल, हे पाहिले जाते. नैतिक पद्धतींची ग्वाही आणि पारदर्शक निधी व्यवस्थापनाच्या वचनबद्धतेमुळे आम्हाला ग्राहकांचा विश्वास आणि निष्ठा प्राप्त झाली आहे. आम्ही जबाबदारीने उत्खनन केलेल्या सामग्रीच्या पुरवठा मिळवण्यासाठी आणि आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्यासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी समर्पित आहोत."
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची भारतातील सध्याच्या कार्यपद्धतीमध्ये अधिक स्टोअर्स उघडण्यासोबतच, झारखंड, गोवा, आसाम, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीर सारख्या राज्यांमध्ये ब्रॅण्डची उपस्थिती वाढवत नेण्याची योजना आहे. भारताच्या पलीकडे, कंपनीचे सध्या संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, बहारीन, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया येथे स्टोअर्स कार्यरत आहेत. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा स्वतःचा अत्याधुनिक डिझाइन स्टुडिओ, प्रशिक्षण केंद्र आणि संशोधन व विकास विभाग देखील आहे. कंपनी अर्न्स्ट अँड यंग, डेलॉइट, अँक्सेंच्युअर आणि आयबीएम सारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध सल्लागार कंपन्यांच्या सेवांचा लाभ घेते.
पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी कंपनीकडून आठ देशांमध्ये १४ सप्लाय चेन मॅनेजमेंट युनिट्स आणि पाच देशांमध्ये १५ आभूषण निर्मिती प्रकल्प चालवले जात आहेत, जे २५ पेक्षा जास्त खास ब्रँड कलेक्शन्स घडवणाऱ्या डिझाईन स्टुडिओद्वारे पूरक आहेत. भारतातील, उत्पादन विभाग केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे आहेत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर युनिट्स संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि बांगलादेशमध्ये आहेत.
याव्यतिरिक्त, जयपूर, सुरत, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये नवीन दागिने निर्मिती कारखाने स्थापण्याची तयारी सुरू आहे. १०० देशांमध्ये १५ दशलक्षापेक्षा जास्त ग्राहक असलेल्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स हे जागतिक दागिने क्षेत्रातील उत्कृष्टतेचे वैशिष्ट्य हे 'मेक इन इंडिया, मार्केट टू द वर्ल्ड' या मिशनद्वारे जपत आले आहे.
मलाबार समूहाचे कोझिकोड येथील मुख्यालयाव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय मुख्यालय दुबई येथे आहे आणि तर राष्ट्रीय केंद्र मुंबई येथे आहे. पुरवठा साखळी व्यवस्थापन, सोर्सिंग, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, सीआरएम, सर्व चॅनेल ऑपरेशन्स, कॉर्पोरेट गिफ्टिंग, बी२बी विभाग, मानवी संसाधने आणि विधी विभाग, मर्चेंडाइजिंग आणि बुलियन यांचा समावेश असलेली ही धोरणात्मक स्थाने वर्तमान आणि भविष्यातील व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ब्रँडला चालना देतात. या केंद्रांचा फायदा घेऊन ब्रँडला वाढीद्वारे नवीन उंची गाठण्यासाठी नेतृत्वाची भूमिका घेण्यास सक्षम केले जात आहे.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स जबाबदार ज्वेलर्स म्हणून केवळ जबाबदार खाण चालक आणि कायदेशीर पुरवठादारांकडून सोने आणि हिरे मिळवून, त्यांच्या दागिन्यांची शुद्धता सुनिश्चित करून त्यांची प्रतिष्ठा कायम ठेवत असते. हा ब्रँड नैतिक व्यवसाय पद्धती, पारदर्शक निधी व्यवस्थापन आणि जागतिक कामकाजात व्यावसायिकता, व्यापारी संस्था, वित्तीय संस्था आणि सरकारी नियामकांसोबतच्या वचनबद्धतेची पूर्तता करतो. जबाबदार स्त्रोतांकडून 'रँड प्युअर गोल्ड' आयात करणे कंपनीचे नैतिक सोर्सिंगचे समर्पण अधोरेखित करते. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स प्रत्येक कार्यरत देशातील कायदेशीर तरतुदी आणि कर प्रणालींचे काटेकोरपणे पालन करते, राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी करविषयक दायीत्वाची पूर्तता करते. या व्यतिरिक्त, मलाबार समूह स्व-पुढाकाराने आणि सक्रियपणे कर चुकवेगिरी आणि सोन्याच्या तस्करीच्या विरोधात जनजागृती मोहीमा देखील राबवते.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आपल्या ग्राहकांना "वन इंडिया वन गोल्ड रेट" योजनेसारख्या उपक्रमांद्वारे मूल्य आणि सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यामुळे देशभरातील सोन्यासाठी सातत्यपूर्ण किंमत सुनिश्चित होते.कंपनी आपल्या ग्राहकांना १० आश्वासने देते, ज्यात निव्वळ वजन, दगडाचे वजन आणि दगड शुल्क यावरील तपशीलवार माहितीसह पारदर्शक किंमत समाविष्ट आहे. ग्राहकांना दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल, जुन्या दागिन्यांची देवाणघेवाण करताना सोन्याचे १०० टक्के मूल्य आणि सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारा एचयूआयडी हॉलमार्क यांचाही फायदा होतो. याव्यतिरिक्त, ब्रँड २८ सूत्री प्रयोगशालेय चाचण्यांद्वारे गुणवत्तेची हमी देऊन आयजीआय-जीआयए प्रमाणित हिरे प्रदान करतो.
तसेच, बायबॅक गॅरंटी आणि सर्व दागिन्यांवर एक वर्षाचे मोफत विमा संरक्षण, मंजूर स्त्रोतांकडून सोन्याचा जबाबदारीने पुरवठा मिळविणे आणि वाजवी वेतन, फायदे आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगले कामाचे वातावरण यासह योग्य वागणुकीची हमी दिली जाते.