सेन्सेक्स मध्ये बँक निर्देशांकात आज वाढ झालेली दिसली. बँक सेन्सेक्स ९४.८५ अंशाने वाढत ५४०३३.८९ पातळीवर पोहोचला आहे. मात्र सेन्सेक्स ५०, १०० निर्देशांकात एस अँड पी सेन्सेक्सप्रमाणे घट झाली आहे. बीएससी मिडकॅप व स्मॉलकॅप मध्येही घसरण पहायला मिळाली आहे. निफ्टीत देखील निफ्टी बँक निर्देशांकात १२४.९० अंशाने वाढ होऊन ४७५८१.०० पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टी, नेक्स्ट ५० वगळता निफ्टी ५० प्रमाणेच निफ्टी फायनांशियल सर्विसेस, निफ्टी मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांकात देखील घट झाली आहे. निफ्टी मिडकॅप ०.४८ टक्क्याने घसरत १३९८९.०५ पातळीवर व स्मॉलकॅप १.०८ टक्क्याने घसरत ७४३१.३० पातळीवर पोहोचला आहे.
निफ्टीच्या सेक्टोरल इंडायसेसमध्ये (श्रेत्रीय) निर्देशांकात बँक,ऑटो, रियल्टी, हेल्थकेअर वगळता बाकी निर्देशांकात मात्र गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले. पीएसयु बँक(२.५६ %) ऑटो समभागात (१.३५ %) सर्वाधिक वाढ झाली असून त्याखालोखाल फार्मा (०.३१ ) ,रियल्टी (०.३१ ) हेल्थकेअर (०.०७ %) इतकी वाढ झाली आहे. निफ्टीवर सर्वाधिक आयटी समभागात (१.५९ %) नुकसान होत त्याखालोखाल गुंतवणूकदारांना निफ्टी एफएमसीजी (१.०५ %) मिडिया (१.३७ टक्के),मेटल (०.२२ %) निर्देशांकात मात्र आज घसरण झाली आहे.
बीएससीत टाटा मोटर्स, एसबीआय, सनफार्मा, एम अँड एम, इंडसइंड बँक, मारूती सुझुकी या समभागावर (शेअर्स) मध्ये सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक नुकसान बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, नेसले,टीसीएस,अल्ट्राटेक सिमेंट,विप्रो या समभागात आज घसरण झाली आहे. तर निफ्टी ५० मध्ये टाटा मोटर्स, बजाज ऑटो, भारती , ओएनजीसी, एसबीआयएन या समभागात सर्वाधिक वाढ झाली असून गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान बजाज फिनसर्व्ह, नेसले इंडिया, इन्फी, टीसीएस, बजाज फायनान्स या समभागात झाले आहे.टाटा मोटर्स व बजाज ऑटोने आज चांगले प्रदर्शन केले असून टाटा डिमर्जर अनुमती नंतर टाटा मोटर्स समभागात वाढ झाली होती. आज दिवसभरात निफ्टीची पातळी २२४१६.९० पातळीवर पोहोचली होती. एनएससी संकेतस्थळावरील माहितीनुसार २२ कंपन्यांचे समभाग यशस्वी ठरून २९ कंपन्यांचे समभाग कंपन्यांनी नाकारले आहे. आज दिवसभरात आर्थिक उलाढालीत निफ्टीतील कंपन्यांचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ३८९.३० लाख कोटींवर गेले आहे.
क्रुड (कच्च्या) तेलाच्या किंमतीत किंचितशी वाढ झाली. तेलाच्या निर्देशांकात ०.०८ वाढत ८२.७८ प्रति बॅरेल पर्यंत पोहोचला. संध्याकाळपर्यंत एमसीएक्स निर्देशांक प्रति बॅरेल ६५३४.०० पर्यंत पोहोचला होता. गुडरिटर्न्स या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या भावात देखील सरासरी ७० ते ७६ रूपयांची वाढ झाली होती.
बाजारातील क्षेत्रीय विशेष कामगिरीनंतर आज मार्केटमध्ये चढ उतार खूपदा दिसली आहे.आयआयएफएल वर रिझर्व्ह बँकेने सोने कर्ज वितरणास घातलेली बंदी घातली असली तरी मुथुट फायनान्स सारख्या कर्ज वितरण कंपन्यांच्या समभागात घसरण झाली नाही. वेदांताचा समभागही कंपनीच्या वाढलेल्या कामगिरीने ४ टक्क्यांपर्यंत उसळता. इलेक्ट्रिक व प्रवासी वाहन कंपन्यांची विभागणी केल्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर तब्बल ८ टक्क्याने वाढला आहे.
टाटा मोटर्स डिमर्जरविषयी प्रतिक्रिया देताना, एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर रिसर्च एनालिस्ट अश्विन पाटील म्हणाले, ' टाटा मोटर्सच्या दोन व्यवसायांमध्ये CVs आणि PVs मध्ये विलग झाल्याची घोषणा व्यवसाय मूल्य अर्ध्यामध्ये विभाजित करेल आणि लक्ष केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिकता सक्षम करेल. तसेच दोन्ही व्यवसायांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, जे या हालचाली स्पष्ट करते. त्यांची व्हॉल्यूम कामगिरी, मार्जिन,चालक, स्पर्धक पूर्णपणे वैविध्यपूर्ण आहेत. त्यामुळे ही कंपनीची एक स्मार्ट चाल आहे,जी आता काही काळापासून नेहमीच चर्चेत होती. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, पीव्ही व्यवसाय आता थेट मार्केट लीडर मारुतीशी स्पर्धा करू शकतो, जेएलआरच्या रूपात जागतिक दारूगोळा आणि मूल्यमापन आघाडीवरील अंतर भरून काढू शकतो.
कार्ड्सवर Hyundai ची सूची आणि M&M चौथा प्रतिस्पर्धी म्हणून, PV स्पेसमधील भांडण पाहणे मनोरंजक असेल आणि गुंतवणूकदारांना त्यापैकी चार निवडण्यासाठी योग्य पर्याय देऊ शकेल. CV आघाडीवर, TaMo थेट स्थानिक खेळाडू अशोक लेलँडशी स्पर्धा करेल.आमचा विश्वास आहे की रोखीचा चांगला वापर सकारात्मक भावनांना जोडला पाहिजे. त्याचे समान विभाजन असल्याने, आम्ही मूल्यांकनावर कॉल करू शकत नाही.आम्ही स्टॉकवर सकारात्मक आहोत. ”
आंतरराष्ट्रीय पातळीवर बीटकॉइनमध्येही वाढ झालेली आहे. काल बीटकॉइनेही २.५ ट्रिलियन डॉलरची पातळीवर पोहोचत नवा उच्चांक गाठला होता. गेल्या २४ तासात बीटकॉइमध्ये पुन्हा २.७८ टक्क्याने वाढ झाली आहे. आशियाई शेअर बाजारात निकेयी , हांगसेंग बाजारातील निर्देशांकात घट झाली असून भारतीय गिफ्ट निफ्टी व शांघाय बाजारात निदर्शकांत वाढ झाली आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह व्याजदर रेट कपात झाली नसली तरी आज जगभरात गुंतवणूकदारांचा प्रतिसाद तितकासा सकारात्मक राहिलेला नाही.
आजच्या बाजारातील स्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' संमिश्र संकेतांमध्ये बाजार अस्थिर झाले आणि माफक तुटीने संपले. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी पहिल्या सहामाहीत खाली वळला, परंतु निवडक हेवीवेट्समध्ये तीक्ष्ण पुनर्प्राप्ती; विशेषतः बँकिंग पॅकमधून तोटा कमी केला. परिणामी, निफ्टी २२३५६.३० च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल चालू राहिला, ज्याने सहभागींना व्यस्त ठेवले ज्यामध्ये ऑटो आणि एनर्जी हिरवा झाला तर IT आणि FMCG मध्ये घसरण वाढली आणि या समभागात प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.आम्ही बाजारांबद्दल आमच्या उत्साही दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करतो आणि "बाय ऑन डिप्स" दृष्टिकोन पुढे चालू ठेवण्याचे सुचवतो. तथापि,अत्याधिक अस्थिरता आणि क्षेत्रांमधील खोटे ब्रेकआउट स्टॉकच्या निवडीमध्ये आव्हाने निर्माण करत राहतील. आम्ही अशा प्रकारे पोझिशन साइज तपासण्याची आणि इंडेक्स मेजर आणि लार्ज मिडकॅप नावांना प्राधान्य देण्याची शिफारस करतो.