मुंबई: नियमावलींची अमंलबजावणी करण्यासाठी आरबीआयने सक्त पाउले उचलली असून जेएम फायनांशियल (JM Financials),आयआयएफएल (IIFL) या दोन विना बँकिंग आर्थिक संस्थेची सखोल चौकशी आरबीआयने (Reserve Bank of India) ने सुरू केली आहे. यासाठी आरबीआयने लेखा परिक्षकांची (ऑडिटर्स) समिती नेमली असून या दोन्ही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी आरबीआयने जे एम फायनांशियल सर्विसेस व आय आयएफएल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध न पाळल्याचा ठपका ठेवत आयआयएफएल फायनान्स या कंपनीला सुवर्ण कर्ज देण्यास व जे एम फायनांशियल सर्विसेस कंपनीला शेअर व डिंबेचर बदल्यात कर्ज वितरण करण्यास मनाई केली होती. कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत या कंपन्यांना या प्रकारची कर्ज देण्यास मनाई केली आहे.
या सगळ्या चौकशी प्रक्रियेत सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) व आरबीआयच्या संयुक्त विद्यमाने हे ऑडिट होऊ शकते. यासाठी आरबीआयने ऑडिटर्सच्या नेमणूकीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. बिडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ८ एप्रिल देण्यात आली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार,आयआयएफएल फायनान्सच्या आर्थिक ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या आर्थिक लेखाजोखा तपासला जाऊ शकतो.
"कर्ज मंजूर करताना आणि डिफॉल्टवर लिलावाच्या वेळी सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजन तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात गंभीर विचलनांसह कंपनीच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये काही सामग्री पर्यवेक्षी चिंता आढळल्या 'असे आरबीआयने अटलयू एका निवेदनात म्हटले आहे.