नवी दिल्ली : (विशेष प्रतिनिधी) लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गटाच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्रक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दि. २२ मार्च रोजी जारी केले आहे.
भाजप लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - अजित पवार गट यांना पाठिंबा देणार आहे, असा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी घेतला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 चा टप्पा पार करेल. जनतेच्या आशीर्वादाने 400 हून अधिक जागांच्या बहुमताने यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन होणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.