‘नवरा माझा नवसाचा२’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : नवस फेडण्याची अनोखी पद्धत ज्या लोकप्रिय चित्रपटात दिसली तो म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha 2) चित्रपट. काही दिवसांपुर्वी २००४ ला प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाच्या पुढच्या भागाची अर्थात नवरा माझा नवसाचा २ ची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता वॅकी आणि भक्तीचा नवा नवस कोणता असणार, तो फेडण्याची पदधत काय असणार हे पाहण्यास प्रेक्षत उस्तुक झाले आहेत. दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’चे चित्रीकरणही सुरू असून कोकणातून एक व्हिडिओ समोर आला आहे.
'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात अनेक नवे कलाकार दिसणार आहेत त्यापैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी. त्याने नुकताच एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्याने लिहिलं होतं की ‘चाललो नवस फेडायला’. आता या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात स्वप्नीलच्या हातात बाप्पाची सुंदर मूर्ती सुप्रिया सचिन यांच्याकडे बॅग्स दिसत आहेत.
'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाचे शूटिंग सध्या वेगाने सुरू आहे. याविषयी सचिन पिळगांवकर म्हणाले होते की, 'नवरा माझा नवसाचा या चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रेम प्रचंड प्रेम केले आहे. अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या प्रतिभावान कलाकारांसह मी चित्रपटाचा दुसरा भाग करतोय. बऱ्याच वर्षांनी सुप्रियासोबत सिनेमात काम करणार आहे याचा विशेष आनंद आहे”.