‘योद्धा’ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात, तर ‘शैतान’ चित्रपट देतोय टक्कर

    16-Mar-2024
Total Views | 32
करण जोहर निर्मित आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनिच 'योद्धा'ने पहिल्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊयात.
 

yodha 
 
मुंबई : पुष्कर ओझा दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ (Yodha) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाईला सुरुवात केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Yodha) आणि दिशा पटनी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘योद्धा’ (Yodha) १५ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्रपटाने किती कमाई केली.
 
‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘योद्धा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंबईपेक्षा हा चित्रपट चेन्नई, हैदराबाद आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिला गेला.
 

yodha 
 
सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाला अजय देवगण, आर माधवन यांचा शैतान चित्रपट टक्कर देताना दिसत आहे. ८ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत देशात ८४.२५ आणि जगभरात ११५.२५ कोटी कमावले आहेत. त्यामुळे सिद्धार्थचा योद्धा देखील त्याच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत जाणार का असा प्रश्न उभा राहात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121